Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Nagpur News : नागपूरच्या वर्धा रोडवरील चिंचभुवन-मिहान इंटरचेंज उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. राँग साईड प्रवासामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून, नागपूर ते बुटीबोरीचा २० मिनिटांचा प्रवास आता ४५ मिनिटांवर पोहोचला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 22, 2026 | 03:48 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • राँग साईड प्रवासामुळे अपघातांचा धोका
  • २० मिनिटांच्या प्रवासासाठी लागताहेत ४५ मिनिटे
  • ६१९ कोटींचा प्रकल्प नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार
Nagpur News : नागपूरच्या वर्धा रोडवरील चिंचभुवन-मिहान इंटरचेंज उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असले, तरी या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ६१९ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रस्त्यावरील उपलब्ध जागा कमी झाली असून, वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

त्यातच अनेक वाहनचालक शॉर्टकटच्या नादात राँग साईडने प्रवास करीत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. वाहतूक पोलिसांच्या अनियमित उपस्थितीमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

राँग साईड प्रवासामुळे अपघातांचा धोका

उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी रस्त्याच्या काही भागात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांसाठी उपलब्ध जागा मर्यादित झाली आहे. लांबचा यू-टर्न घेण्याची कसरत टाळण्यासाठी अनेक वाहनचालक थेट विरुद्ध दिशेने वाहने चालवत आहेत.

परिसरातील दुकाने, व्यावसायिक आस्थापने, शाळा आणि विविध संस्थांमध्ये जाणारे नागरिकही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता वाढली आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी दुभाजक हटवून सर्व्हिस रोड मुख्य महामार्गाला जोडला होता. मात्र, या व्यवस्थेचा योग्य वापर न करता काही वाहनचालक राँग साईडने प्रवास करीत आहेत.

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी

२० मिनिटांच्या प्रवासासाठी लागताहेत ४५ मिनिटे

वर्धा रोडवर उड्डाणपुलासोबतच मेट्रोचे बांधकामही सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. नागपूर ते बुटीबोरी हा प्रवास पूर्वी साधारण २० मिनिटांत पूर्ण होत होता. मात्र, आता याच अंतरासाठी जवळपास ४५ मिनिटे लागत असल्याची तक्रार नियमित प्रवासी करीत आहेत.

चिंचभुवन ते मिहान इंटरचेंजदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. नागपूरला वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद, यवतमाळ आणि मुंबईशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथील वाहतूक कोंडीचा परिणाम हजारो प्रवाशांवर होत आहे.

Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर

६१९ कोटींचा प्रकल्प नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार

चिंचभुवन-मिहान इंटरचेंज उड्डाणपुलाची लांबी सुमारे २.६ किलोमीटर असून, हा सहापदरी प्रकल्प आहे. त्यासाठी ६१९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बहुतांश खांबांचे बांधकाम पूर्ण झाले असून, मिहान इंटरचेंजच्या दिशेने गर्डरचे सेगमेंट बसवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. नोव्हेंबर २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मात्र, बांधकाम पूर्ण होण्यास अद्याप वेळ असल्याने तोपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजन, नियमित पोलीस बंदोबस्त आणि राँग साईड वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Nagpur news wardha road wrong side driving traffic jam accident risk cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • wrong

संबंधित बातम्या

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक
1

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: विक्रांत मेसीने भर कार्यक्रमात शाहरुख खानचे धरले पाय? किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया
2

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: विक्रांत मेसीने भर कार्यक्रमात शाहरुख खानचे धरले पाय? किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता
3

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी
4

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.