Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी

Nagpur News : नागपूरमध्ये एअर शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, अचानक दाटलेल्या ढगांमुळे हवाई प्रात्यक्षिकांचा थरार पाहण्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे नागरिकांचा उत्साह काहीसा कमी झाला, तरीही शो पाहण्यासाठी मोठी गर्दी कायम होती.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 22, 2026 | 03:13 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • फुटाळ्यावर गर्दी, पण बॅरिकेडिंगमुळे अडथळा
  • पुन्हा सोनेगाव विमानतळावर एअर शोची मागणी
  • चिमुकल्यांमध्ये उत्साह
  • प्रकाशावरही परिणाम
  • फुटाळ्यावर गर्दी, पण बॅरिकेडिंगमुळे अडथळा
Nagpur News : आकाशात झेपावणारी लढाऊ विमाने, त्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या गर्जना आणि चित्तथरारक हवाई कसरती… भारतीय वायुसेनेच्या एअर शोच्च्या सरावाचा थरार अनुभवण्यासाठी शनिवारी सकाळी नागपूरकरांनी एकच गर्दी केली. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण कुटुंबीयांसह विमानांची झलक पाहण्यासाठी रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांवर जमले होते.

मात्र, सकाळच्या पावसानंतर दाटलेले ढग आणि धुक्यामुळे हवाई कसरतींचा रंग फिका पडला. सारंग आणि सूर्यकिरण पथकाने प्रात्यक्षिके सादर केली. मात्र, आकाशगंगा पथकाचे पॅराग्लायडिंग होऊ शकले नाही. सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानानेही नियोजित ३ ऐवजी केवळ एकच फ्लायपास्ट केला. वायुसेनानगर येथील मॅटेनन्स कमांड परिसरात एअर शोची रंगीत तालीम आयोजित केली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरात केवळ निमंत्रितांनाच प्रवेश दिला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बाहेरूनच हवाई कसरती पाहण्याची संधी होती. यापूर्वीच्या अनुभवामुळे अमरावती मार्ग, फुटाळा तलाव, दाभा आणि काचीमेट परिसरात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. अनेक पालक मुलांना घेऊन आले होते. रस्त्यांच्या कडेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर प्रत्येकाची नजर आकाशाकडे लागली होती.

Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर

फुटाळ्यावर गर्दी, पण बॅरिकेडिंगमुळे अडथळा

हवाई कसरती पाहण्यासाठी फुटाळा तलाव परिसरात पोहोचलेल्या नागरिकांना पोलिस बंदोबस्ताचाही सामना करावा लागला. बिरसा मुंडा चौकातूनच बैरिकेडिंग करून रस्ता बंद करण्यात आला होता, नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस चौकाकडून येणा-या मार्गावरही निबंध होते. दाभा मार्गावर काही नागरिकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली, तर अनेकांना रोखण्यात आले. कुटुंबीयांसह दूरवरून आलेल्या नागरिकांना आकाशातील कसरती न पाहताच परतावे लागले.

पुन्हा सोनेगाव विमानतळावर एअर शोची मागणी

काही वर्षांपूर्वी नागपुरातील सोनेगाव वायुसेना तळावर एअर शोचे आयोजन केले जात होते. त्यावेळी निमंत्रितांना प्रवेश असला, तरी बाहेरील परिसरातून सर्वसामान्य नागरिकांना हवाई कसरती पाहता येत होत्या. विविध लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि अन्य विमानांचे प्रदर्शनही भरविले जात होते. मात्र, आता एअर शो केवळ निमंत्रितांपुरता मर्यादित राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सोनेगाव वायुसेना तळावर सर्वांसाठी खुल्या एअर शोचे आयोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चिमुकल्यांमध्ये उत्साह

शनिवारी अनेक पालक मुलांना घेऊन एअर शोची रंगीत तालीम पाहण्यासाठी पोहोचले होते. विमानांचा आवाज ऐकताच नागरिकांच्या नजरा आकाशाकडे वळत होत्या. मात्र, हवामानामुळे अपेक्षित प्रात्यक्षिके पाहता न आल्याने अनेकांची निराशा झाली.

Nagpur News : अधिवेशनापूर्वी अवैध होर्डिंग्जवर मनपाचा बडगा; विशेष मोहीम राबवणार

प्रकाशावरही परिणाम

शनिवारी सकाळी झालेल्या पावसानंतर आकाशात ढग दाटून आले होते. धुक्यामुळे दृश्यमानता आणि प्रकाशावरही परिणाम झाला. याचा फटका हवाई प्रात्यक्षिकांना बसला. सारंग हेलिकॉप्टर प्रदर्शन पथक आणि सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाने आकाशात कसरती सादर केल्या. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे त्यांच्या प्रदर्शनावरही मर्यादा आल्या.

फुटाळ्यावर गर्दी, पण बॅरिकेडिंगमुळे अडथळा

हवाई कसरती पाहण्यासाठी फुटाळा तलाव परिसरात पोहोचलेल्या नागरिकांना पोलिस बंदोबस्ताचाही सामना करावा लागला. बिरसा मुंडा चौकातूनच बॅरिकेडिंग करून रस्ता बंद करण्यात आला होता. नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस चौकाकडून येणाऱ्या मार्गावरही निर्बंध होते. दाभा मार्गावर काही नागरिकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली, तर अनेकांना रोखण्यात आले. कुटुंबीयांसह दूरवरून आलेल्या नागरिकांना आकाशातील कसरती न पाहताच परतावे लागले.

Web Title: Nagpur news air show cloudy weather crowd cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…
1

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…

Alka Kubal Daughter Engagement: मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई! लाडक्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा, फोटो पाहिलेत का?
2

Alka Kubal Daughter Engagement: मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई! लाडक्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा, फोटो पाहिलेत का?

Chandrapur News: भद्रावतीत पाणीटंचाईचे संकट? नियमित पाणी द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा माजी नगराध्यक्षांचा इशारा
3

Chandrapur News: भद्रावतीत पाणीटंचाईचे संकट? नियमित पाणी द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा माजी नगराध्यक्षांचा इशारा

Raigad News: रायगडमधील १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार भाजीपाला मिनी किट; जिल्हा परिषदेचा कृषी विभागाचा उपक्रम
4

Raigad News: रायगडमधील १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार भाजीपाला मिनी किट; जिल्हा परिषदेचा कृषी विभागाचा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.