Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :लग्नपत्रिका डाऊनलोड करताच मोबाईल हॅक ;६लाखांची सायबर फसवणूक

Nagpur News : महिला व मुलांवरील सायबर स्टॉकिंग आणि बुलिंग तसेच डेटा चोरीच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. मुंबईत एकट्या 4,939 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून, देशातील महानगरांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी राज्यात वाढत्या सायबर धोक्याचे चित्र स्पष्ट करते .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 05, 2026 | 03:23 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • एपिके फाईल ठरली सापळा
  • ६ लाखांची सायबर फसवणूक
  • मोबाईल सुरु झाल्याने फसवणुकीची कल्पना आली नाही
  • NCRB (National Crime Records Bureau)
Nagpur News : व्हॉट्सऍप वरून आलेली लग्नपत्रिकेची ‘एपीके’ फाईल खरी समजून डाऊनलोड करणे एकाला चांगलेच महागात पडले. फाईल डाऊनलोड होताच मोबाईल हॅक झाला आणि सायबर भामट्यांनी बँक खात्यातून तब्बल ६ लाख १२ हजार २०९ रुपये परस्पर विविध खात्यांमध्ये वळते केले. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश वासुदेव ठाकरे (५२, रा. पांडे ले आऊट, खामला रोड, प्रतापनगर) यांना २९ जुलैला मित्राच्या व्हॉट्सऍप क्रमांकावरून लग्नपत्रिकेची ‘एपीके’ फाईल प्राप्त झाली. मित्रानेच लग्नाचे निमंत्रण पाठविल्याचा समज झाल्याने त्यांनी कोणतीही शंका न घेता ती फाईल डाऊनलोड केली. फाईल डाऊनलोड होताच मोबाईलमध्ये तांत्रिक बिघाड
झाल्यासारखे वाटले. मात्र, त्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले नाही. प्रत्यक्षात ‘एपीके’ फाईलच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवून बँक व्यवहारांची माहिती हस्तगत केली.

Nagpur : प्रथमच विजय हजारे ट्रॉफी जिंकून विदर्भ संघाने रचला नवा इतिहास

मोबाईल सुरू झाल्याने फसवणुकीची कल्पनाही आली नाही

आरोपींनी युनियन बैंक ऑफ इंडियाच्या खात्यातून टप्प्याटप्याने ६ लाख १२ हजार २०९ रुपये विविध बैंक खात्यांमध्ये ऑनलाईन वळते केले. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मोबाईल पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने फसवणुकीची कल्पनाही आली नाही. १ ऑगस्टला बैंक खात्यातून मोठी रक्कम वळती झाल्याचे संदेश आल्यानंतर ठाकरे यांनी खात्याची पडताळणी केली. चौकशीअंती फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीसंबंधीच्या कलमान्वये अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

NCRB (National Crime Records Bureau)

Crime in India 2024 च्या आकडेवारी नुसार २०२४ मध्ये महाराष्ट्रात नोंद झालेले गुन्हे
एकूण सायबर गुन्हे:    9,922
फसवणुकीसाठी (Cyber Fraud) नोंदवलेली प्रकरणे:    6,198
लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणे:    544
खंडणी (Extortion):    68

Nagpur : स्मार्ट शहराचे पोलीस ठाणे कधी होणार स्मार्ट ?
प्रँक/त्रास देण्याचे प्रकार:    64
राग किंवा सूडातून केलेले गुन्हे:    53
याशिवाय महाराष्ट्रात महिला व मुलांवरील सायबर स्टॉकिंग आणि बुलिंगची सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली.
डेटा चोरीच्या प्रकरणांतही महाराष्ट्र देशात अव्वल राहिला. ऑनलाइन फसवणूक, ओळख चोरी (Identity Theft) आणि गेमिंग ऍप फसवणुकीतही राज्य अग्रस्थानी आहे.

2025 ची महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांची अधिकृत आकडेवारी NCRB सहसा मागील वर्षाचा अहवाल पुढील वर्षाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध करते.

Web Title: Nagpur news mobile hacked upon downloading wedding invitation 6 lakh cyber fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • cyber crime
  • Nagpur Crime News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
1

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
2

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
4

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.