Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : ‘नागपूर तो झांकी है, आझाद मैदान बाकी है’ ; कंत्राटदार उतरले रस्त्यावर

Nagpur News : नागपूर येथील सरकारी कंत्राटदारानीं आपल्या थकलेल्या बिलांच्या पैश्यांसाठी आंदोलन छेडले आहे . शर्ट काढून त्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे . तसेच सरकराने यावर तोडगा नाही काढल्यास हे आंदोलन अधिक व्यापक करून आझाद मैदानात धडकेल असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 13, 2026 | 02:36 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सिंघम स्टाईल ने कंत्राटदार उतरले रस्त्यावर
  • प्रमुख मागण्या
Nagpur News : ‘पैसे द्या’, ‘न्याय द्या’ लिहिलेली गांधी टोपी, फलक आणि ‘पैसे आमच्या हक्काचे ,नाही कुणाच्या बापाचे’, ‘नागपूर तो झांकी है, आझाद मैदान बाकी है’ अशा घोषणा जल जीवन मिशनसह अन्य विभागांची कामे करणारे कंत्राटदार थकबाकी मिळवण्यासाठी बुधवारी अर्धनग्न अवस्थेत ‘सिंघम स्टाईल’ रस्त्यावर उतरले. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेत केलेल्या पाणीपुरवठ्याच्या कामांची थकबाकी मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना आणि शासकीय कंत्राटदार संघटनेच्यावतीने संविधान चौकात धरणे दिल्यानंतर जीपीओ चौकातील मुख्यमंत्र्यांचे सचिवालय हैद्राबाद हाऊस येथे मोर्चाद्वारे धडक दिली.

Nagpur News : झोनवाढीवरून सभागृहात ‘भारत माता’ विरुद्ध ‘जय संविधान’; घोषणांनी वातावरण तापले

सिंघम स्टाईल ने कंत्राटदार उतरले रस्त्यावर

कंत्राटदारांनी शर्ट काढून सरकारचा निषेध केला. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांसह राज्याच्या अन्य जिल्ह्यांतील प्रतिनिधीही आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी विविध जिल्ह्यांच्या प्रतिनिधींनी थकबाकी व सरकारच्या धोरणावर टीका केली. आंदोलनात पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष किशोर जामदार, संघटनेचे तज्ज्ञ संचालक किशोर थोटे, शासकीय कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश वंजारी, उपाध्यक्ष वीरेंद्र लोखंडे, सचिव रवींद्र ठाकरे तसेच नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांच्यासह कंत्राटदार सहभागी झाले होते.

Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !

प्रमुख मागण्या

  1. २५ महिन्यांपासून जिल्ह्यात सुमारे १२० कोटी रुपये तर राज्यभरात सुमारे १० हजार कोटी रुपये थकित आहेत. सरकारने जुन्या कामांचे आधी पैसे द्यावे.
  2. जल जीवन मिशनची प्रलंबित देयके शंभर टक्के द्या
  3. केंद्राने मिशनव्या कामांना २०२८ पर्यंत मुदतवाढ दिल्याने सर्व कामांना विनादंड मुदतवाढ द्या आणि आधी आकारलेला दंड परत करा

Web Title: Nagpur news nagpur to zanki hai azad maidan baki hai contractors hit the road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News
  • Protest

संबंधित बातम्या

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी
1

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
2

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

PoK Protest : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाला ‘काळा दिवस’;परदेशातील दूतावासांसमोर निदर्शनांचे आवाहन
3

PoK Protest : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाला ‘काळा दिवस’;परदेशातील दूतावासांसमोर निदर्शनांचे आवाहन

Nagpur News : झोनवाढीवरून सभागृहात ‘भारत माता’ विरुद्ध ‘जय संविधान’; घोषणांनी वातावरण तापले
4

Nagpur News : झोनवाढीवरून सभागृहात ‘भारत माता’ विरुद्ध ‘जय संविधान’; घोषणांनी वातावरण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.