Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: दिवाळीनंतर पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची लूट! विद्यार्थ्यांकडून उकळले हजारो रुपये; ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५ खाजगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांची आर्थिक लूट आणि नियमबाह्य मालवाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने २७ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 17, 2026 | 02:36 PM
Amravati News: दिवाळीनंतर पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची लूट! विद्यार्थ्यांकडून उकळले हजारो रुपये; ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई

Amravati News: दिवाळीनंतर पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची लूट! विद्यार्थ्यांकडून उकळले हजारो रुपये; ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • अमरावती-पुणे प्रवास आता २ हजार ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला
  • प्रवाशांची आर्थिक लूट आणि नियमबाह्य मालवाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने २७ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम
  • निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या ३५ खाजगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई
अमरावती: दिवाळीच्या सुट्या संपताच पुणे आणि मुंबईकडे परतणाऱ्या विद्यार्थी व नोकरदारांची गर्दी वाढली असून, याच संधीचा गैरफायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्सचालकांनी प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू केली आहे. अमरावती-पुणे मार्गावर नेहमी १ हजार ते १ हजार ५०० रुपये असणारे तिकीट थेट २ हजार ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत आकारले जात आहे. या मनमानी भाडेवाढीविरोधात विदर्भ ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहड यांनी वेलकम पॉईंटवर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले.

Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी

त्यांच्या आंदोलनानंतर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५ खाजगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली. दिवाळीच्या सुट्या संपवून शिक्षण आणि नोकरीनिमित्त पुणे, मुंबईकडे परतणाऱ्या तरुणांची सध्या मोठी गर्दी आहे. याचा फायदा घेत खाजगी बसचालकांनी तिकिटांचे दर दुप्पट ते तिप्पट केले आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created) 

सामान्य दिवसांत १ हजार ते १ हजार ५०० रुपयांत होणारा अमरावती-पुणे प्रवास आता २ हजार ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विदर्भातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थी मोठ्या कष्टाने बाहेरगावी शिक्षणासाठी जातात.

केवळ नोटीस नको, बसेस जप्त करा

खासगी प्रवासी वाहतुकीसंदर्भातील नियमांनुसार राज्य परिवहन महामंडळाच्या निर्धारित भाड्यापेक्षा दीडपट अधिक भाडे आकारण्यास मनाई असल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. तसेच खाजगी बसेसना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी थेट प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असताना शहरात ठिकठिकाणी कार्यालये थाटून तिकीट विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांत क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूकही होत असल्याचे मोहड यांनी निदर्शनास आणून दिले.

१६० वाहनांवर कारवाईचा बडगा

प्रवाशांची आर्थिक लूट आणि नियमबाह्य मालवाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने २७ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत, परवानगी असलेल्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या ८० बसेसवर प्रत्येकी १०,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या ३५ खाजगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, विनापरवाना धावणाऱ्या १६० वाहनांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

प्रवाशांची तिकिटे तपासताच मनमानी उघड

या प्रकाराविरोधात विदर्भ ऑटो युनियनचे अध्यक्ष मोहड यांनी सहकाऱ्यांसह अमरावतीच्या वेलकम पॉईंटवर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच प्रादेशिक परिवहन अधिकारी दळवी आणि जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या प्रसंगी, आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बसेस थांबवल्या आणि प्रवाशांची तिकिटे तपासली. त्यात एका ट्रॅव्हल्सच्या बसमधील प्रवासी राकेश शिवणकर यांच्याकडून तब्बल ३ हजार ६५० रुपये, तर गौरव यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांकडून २ हजार ते २ हजार ५०० रुपये भाडे आकारल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, संबंधित ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांची अधिकृत यादी आणि दैनंदिन परवानाही नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले. याप्रकरणी कुंदन ट्रॅव्हल्सला दंडात्मक नोटीस बजावण्यात आली.

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

१० दिवस विशेष तपासणी मोहीम

प्रादेशिक परिवहन अधिकारी दळवी यांनी सांगितले की, २७ ऑक्टोबरपासून ६०० वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्याऱ्यांविरोधात पुढील १० दिवस विशेष तपासणी मोहीम सुरू राहणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले. मात्र, आगामी नाताळ आणि उन्हाळी सुट्टयांमध्येही प्रवाशांची अशी आर्थिक लूट होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी कायम आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Amravati travel operators face action for overcharging passengers 35 private buses fined after diwali hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Amaravati
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

‘इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना गुलाम समजतात’; संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरेंवर आरोप
1

‘इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना गुलाम समजतात’; संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

Thane News: ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतच पक्षात उरतील’; नरेश म्हस्केंचा खोचक टोला
2

Thane News: ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतच पक्षात उरतील’; नरेश म्हस्केंचा खोचक टोला

Khatu Shyam Ji Birthday 2026: खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव 20 की 21 नोव्हेंबरला? तारीख ठरली, घरी पूजा कशी कराल?
3

Khatu Shyam Ji Birthday 2026: खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव 20 की 21 नोव्हेंबरला? तारीख ठरली, घरी पूजा कशी कराल?

Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी
4

Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.