Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Steals Gold For iPhone: “सोन्याचे मंगळसूत्र-नेकलेस विकून घेतला आयफोन!”नागपुरातील सुनेचा भयंकर पराक्रम…

Steals Gold For iPhone: आयफोनच्या वेडापायी सुनेने ओलांडल्या सर्व मर्यादा! नागपुरात सासूचे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने चोरून विकले अन् घेतला महागडा फोन; शिर्डीला जाण्यासाठी कपाट उघडताच सासूच्या पायाखालची सरकली जमीन!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 10, 2026 | 10:47 AM
Steals Gold For iPhone: "सोन्याचे मंगळसूत्र-नेकलेस विकून घेतला आयफोन!"नागपुरातील सुनेचा भयंकर पराक्रम...

Steals Gold For iPhone: "सोन्याचे मंगळसूत्र-नेकलेस विकून घेतला आयफोन!"नागपुरातील सुनेचा भयंकर पराक्रम...

Follow Us
Follow Us:
  • आयफोनसाठी सुनेने सासूचे ५३ ग्रॅम सोने चोरून विकले
  • शिर्डीला जाताना प्रकार उघडकीस आला
  • सुनेने कबुली दिली पण दागिने दिले नाहीत
Steals Gold For iPhone: सध्याच्या काळात तरुण पिढीमध्ये महागड्या आयफोनची क्रेझ प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, हीच हौस पूर्ण करण्यासाठी उपराजधानी नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चकित करणारा प्रकार समोर आला आहे. नागपुरात महागड्या आयफोनची हौस भागवण्यासाठी सुनेने चक्क आपल्याच सासूच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. सोन्याचे कष्टाने जमवलेले दागिने चोरून ते विकले आणि त्या पैशांतून ॲपल कंपनीचा आयफोन खरेदी केल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा: Teacher Couple Suicide: “ऑगस्टमध्ये लग्न, अन् दिवाळीत संपला प्रवास!” गडचिरोलीतील शिक्षक दांपत्याची  नागपुरात आत्महत्या

५३ ग्रॅम सोन्याचे दागिने अचानक गायब

ही धक्कादायक घटना नागपुरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ग्रंथाली आकाश वर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी सुनेचे नाव असून, तिची सासू राधा वर्मा यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राधा वर्मा यांना शिर्डी येथे दर्शनासाठी जायचे होते. प्रवासाचा खर्च आणि परिधान करण्यासाठी दागिने काढायला त्यांनी जेव्हा कपाट उघडले, तेव्हा कपाटात ठेवलेले ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये ३० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, १३ ग्रॅमचा नेकलेस आणि १० ग्रॅमचे इतर दागिने असा सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज होता.

संशय खरा ठरला; सासू थेट पोलीस ठाण्यात

आयुष्यभर कष्टाने जपलेले दागिने अचानक गायब झाल्यामुळे सासूला प्रचंड मानसिक धक्का बसला. यापूर्वीही सुनेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल असल्याने सासू राधा यांना तिच्यावरच संशय आला. सासू-सासऱ्यांनी जेव्हा सुनेकडे याबाबत कडक विचारणा केली, तेव्हा तिने दागिने चोरल्याची कबुली दिली व ते लवकरच परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वारंवार मागूनही तिने दागिने परत न केल्याने अखेर सासूने पोलिसांत धाव घेतली.

हेही वाचा: मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

आयफोन खरेदीची पोलिसांसमोर कबुली

शांतीनगर पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपी सुनेची कसून चौकशी केली. या चौकशीत तिने सासूचे दागिने चोरून विकल्याचे आणि त्यातून आलेले पैसे खर्च करून ॲपल कंपनीचा आयफोन खरेदी केल्याची धक्कादायक कबुली दिली. सुनेचा हा पराक्रम ऐकून पोलीसही चक्रावून गेले. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आरोपी सुनेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस आता विकलेले दागिने हस्तगत करण्याचा आणि पुढील कायदेशीर कारवाईचा तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा धक्कादायक प्रकार नागपुरात कुठे घडला?

    Ans: हा प्रकार नागपूरमधील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

  • Que: सुनेने एकूण किती रुपयांचे आणि किती ग्रॅम सोने चोरले होते?

    Ans: सुनेने सुमारे २,५०,००० रुपये किमतीचे एकूण ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले होते.

  • Que: चोरीचे दागिने विकून सुनेने काय खरेदी केले?

    Ans: चोरीचे दागिने विकून आलेल्या पैशांतून सुनेने ॲपल कंपनीचा आयफोन खरेदी केला.

Web Title: Nagpur shantinagar daughter in law steals gold for iphone sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Gold Jewellery
  • iphone
  • Nagpur Crime
  • Nagpur Crime News

संबंधित बातम्या

Teacher Couple Suicide: “ऑगस्टमध्ये लग्न, अन् दिवाळीत संपला प्रवास!” गडचिरोलीतील शिक्षक दांपत्याची  नागपुरात आत्महत्या
1

Teacher Couple Suicide: “ऑगस्टमध्ये लग्न, अन् दिवाळीत संपला प्रवास!” गडचिरोलीतील शिक्षक दांपत्याची  नागपुरात आत्महत्या

सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण; पतसंस्थेला 9.41 लाखांचा गंडा
2

सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण; पतसंस्थेला 9.41 लाखांचा गंडा

रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण; कॉलर पकडली, ढकलून ठोसाही लगावला
3

रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण; कॉलर पकडली, ढकलून ठोसाही लगावला

Dhanteras 2026 Gold Exchange : धनत्रयोदशीला जुने सोने देऊन नवीन दागिने खरेदी करणे योग्य आहे का? तज्ज्ञांचे मत आणि महत्त्वाचे नियम
4

Dhanteras 2026 Gold Exchange : धनत्रयोदशीला जुने सोने देऊन नवीन दागिने खरेदी करणे योग्य आहे का? तज्ज्ञांचे मत आणि महत्त्वाचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.