Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : प्रथमच विजय हजारे ट्रॉफी जिंकून विदर्भ संघाने रचला नवा इतिहास

Nagpur : विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे (व्हीसीए) २०२५-२६ हंगामात प्रथमच विजय हजारे ट्रॉफी जिंकून इतिहास घडवणाऱ्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचा सत्कार करण्यात आला. जामठा येथील व्हीसीए रिक्रिएशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात विजेत्या संघातील सर्व खेळाडू आणि सहयोगी कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 04, 2026 | 03:23 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • व्हीसीएकडून सत्कार
  • सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश : बडकस
  • अमन मोखाडे ठरले आकर्षण
  • हर्ष दुबे – यश ठाकूर विशेष गौरव
Nagpur ▶  संघाच्या शानदार कामगिरीची उजळणी करत भविष्यातही अशीच यशस्वी कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समारंभाचे प्रमुख पाहुणे आयसीसीचे माजी अध्यक्ष तसेच बीसीसीआय आणि व्हीसीएचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर होते. माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक प्रवीण आमरे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी खेळाडू आणि सहयोगी कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात विजय हजारे ट्रॉफीतील विदर्भाच्या विजयी मोहिमेवर आधारित ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाने झाली.

Nagpur : खुशखबर! दलालांशिवाय घरबसल्या मिळणार भाड्याचे घर; म्हाडाची नवी व्यवस्था नेमकी आहे तरी काय?

हर्ष दुबे व यश ठाकूरचा विशेष गौरव

समारंभात भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विदर्भाच्या दोन क्रिकेटपटूंचाही विशेष सत्कार करण्यात आला.
अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या हर्ष दुबे आणि हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेल्या यश ठाकूर यांना विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

अमन मोखाडे ठरले आकर्षण

विदर्भाचा सलामीवीर अमन मोखाडे हा समारंभाचा प्रमुख आकर्षण ठरला. त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये अवघ्या १६ डावांत १,००० धावा पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने १० सामन्यांत ९०.४४ च्या सरासरीने ८१४ धावा केल्या असून त्यात ५ शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले.

Nagpur : स्मार्ट शहराचे पोलीस ठाणे कधी होणार स्मार्ट ?
सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश: बडकसः व्हीसीएचे मानद सचिव बडकस
म्हणाले, “देशातील सर्वांत प्रतिष्ठेच्या एकदिवसीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे हे खेळाडू, प्रशिक्षक, सहयोगी कर्मचारी आणि प्रशासक यांच्या सामूहिक मेहनतीचे फलित आहे.

महिला क्रिकेटला पुढे नेण्याची वेळ : शशांक मनोहर

शशांक मनोहर म्हणाले, “गेल्या दहा-बारा वर्षांत विदर्भाच्या पुरुष संघांनी देशांतर्गत क्रिकेटमधील जवळपास सर्व प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता महिला खेळाडूनीही त्याच मार्गाने पुढे जाण्याची वेळ आली आहे. योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास विदर्भाचा महिला संघही लवकरच राष्ट्रीय स्तरावर नवे यश मिळवेल.

यश कधीच योगायोग नसतो: प्रवीण आमरे

प्रवीण आमरे यांनी खेळाडूंना सांगितले, “यश कधीच योगायोग नसतो; ते अनेक वर्षांच्या मेहनत, शिस्त आणि समर्पणाचे फलित असते. विदर्भ क्रिकेटच्या यशाचा पाया शशांक मनोहर यांनी घातला आणि प्रशांत वैद्य यांच्यासह संपूर्ण प्रशासनाने तो अधिक मजबूत केला. त्यांनी पहिल्या यशाला सुरुवात मानून पुढेही सातत्याने ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्याचे आवाहन केले.

Web Title: Nagpur vidarbha team creates history by winning the vijay hazare trophy for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • cricket news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी
1

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
2

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
3

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
4

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.