
NMC Election 2026: नागपुरात राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपकडे संशयाची सुई
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लोकशाहीचा हा उत्सव साजरा केला जात असतानाचा आता नागपुरातून एक मोठी घटना समोर आली आहे. नागपुरातील प्रभाग 31 मधील काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
या घटनेत प्रभाग 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय कार्यालयाबाहेरील पेंडोल, पडदे आणि पक्षाचे झेंडे देखील जळालेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालय जळाले की जाळले असा प्रश्न आता काँग्रेसकडून उपस्थित केला जात आहे. तसेच या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर आरोप केले जात आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केले आहेत की, भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय बाहेरील पेंडॉल, पडदे आणि पक्षाचे झेंडे जाळले असावेत.
BMC Election 2026: मतदानादरम्यान वांद्रेमध्ये ईव्हीएम मशीन बंद! केंद्राबाहेर गर्दी, मतदारांचा गोंधळ
भाजप आमदार प्रवीण दटके यांनी याप्रकरणी सांगितलं आहे की, सर्वत्र मतदानाची रणधुमाळी सुरु आहे. अशातच कार्यालय जळाल्याने शहरातील राजकारण तापले आहे. काँग्रेसचे कार्यालय जळाले की काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतः जाळलं याबद्दल आमच्या मनात शंका आहे. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि कारवाई करावी. प्रभाग 11 मध्ये काल रात्री भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांना शंभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उमेदवारांंना मारहाण करणं, हिंसा करणे काँग्रेसची संस्कृती आहे.