Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरातील तलावांमध्ये वेगाने वाढतेय जलपर्णी; महापालिकेचा प्रयोग ठरतोय यशस्वी

अवघ्या वर्षभरात हा प्रयोग ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे. शहरातील स्वयंसहायता गटांसाठी तो आशादायी मॉडेल ठरत आहे. प्रकल्पांतर्गत स्वयंसहायता गटांतील ११० महिलांना विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2026 | 01:46 PM
नागपुरातील तलावांमध्ये वेगाने वाढतेय जलपर्णी; महापालिकेचा प्रयोग ठरतोय यशस्वी

नागपुरातील तलावांमध्ये वेगाने वाढतेय जलपर्णी; महापालिकेचा प्रयोग ठरतोय यशस्वी

Follow Us
Follow Us:

नागपूर : शहरातील तलावांमध्ये वेगाने वाढणारी जलपर्णी ही दीर्घकाळापासून नागपूरसाठी पर्यावरणीय डोकेदुखी मानली जात होती. जलप्रवाह अडवणे, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करणे, दुर्गंधी आणि डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण करणे अशा अनेक समस्यांमुळे ती प्रशासनासाठी आव्हान ठरत होती. मात्र, महापालिकेच्या सामाजिक विकास विभागाने याच जलपर्णीचे उत्पन्नाच्या साधनात रूपांतर करून पर्यावरण आणि रोजगार यांचा अभिनव संगम साधला आहे.

अवघ्या वर्षभरात हा प्रयोग ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे. शहरातील स्वयंसहायता गटांसाठी तो आशादायी मॉडेल ठरत आहे. प्रकल्पांतर्गत स्वयंसहायता गटांतील ११० महिलांना विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण दिले. त्यापैकी १०० महिलांना तलावांमधून जलपर्णी संकलन, वाळवणे, फायबर आणि दोरा तयार करणे तसेच लूम आणि रोलर यंत्रांचे संचालन याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. उर्वरित १० महिलांना शिवणकलेचे विशेष प्रशिक्षण देऊन तयार झालेल्या फायबरपासून आकर्षक आणि उपयोगी वस्तू तयार करण्याचे कौशल्य विकसित केले. सध्या क्लस्टरमध्ये ४० हून अधिक प्रकारच्या पर्यावरणपूरक वस्तू तयार केल्या जात आहेत.

Mumbai News: आरे स्टॉलधारकांना दिलासा ! पुनर्वसनासह स्वतंत्र धोरणासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक

फाईल होल्डर, लॉन्ड्री बॅग, हस्तनिर्मित पर्स, शॉपिंग बॅग, गिफ्ट पॅकिंग साहित्य आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वस्तू सीताबर्डी येथील मनपा स्वयंसहायता गट शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्थानिक बाजारपेठेत त्यांची मागणी वाढू लागली आहे. महिलांना केवळ उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता दीर्घकालीन स्वयंरोजगार मिळावा, यासाठी मनपाने स्वतंत्र प्रशिक्षण यंत्रणा उभारली आहे.

जलपर्णीच्या बॅगमध्ये दिला होता अर्थसंकल्प

मनपाच्या अर्थसंकल्पीय सभेत महापौर, उपमहापौर, सभापती आणि नगरसेवकांना अर्थसंकल्पाच्या प्रती जलपर्णीपासून तयार केलेल्या बॅग्जमध्ये दिल्या होत्या. त्यावेळी कविवर्य सुरेश भट सभागृहात या प्रकल्पाच्या यशाबाबत चर्चा रंगली होती. अवघ्या महिनाभरातच या उपक्रमाचे प्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहे. नागपूरने कचऱ्यातून कला आणि जलपर्णीच्या पर्यावरणीय समस्येतून रोजगार निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग शोधल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आर्थिक स्वावलंबनाला बळकटी देण्याचेही काम सुरू

मनपा प्रशासनाने आता या उत्पादनांच्या विपणनावर विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-कॉमर्स, प्रदर्शन आणि शासकीय खरेदी प्रक्रियेद्वारे या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहे. विविध शासकीय योजनांची जोड देऊन स्वयंसहायता गटांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळकटी देण्याचेही काम सुरू आहे.

शिवण व प्रशिक्षण क्लस्टर सुरू

बर्डी, महाल आणि पारडी येथे तीन शिवण व प्रशिक्षण क्लस्टर सुरू केले आहे. प्रत्येक बॅचमध्ये ३० महिलांना प्रथम तीन महिन्यांचे व मूलभूत आणि त्यानंतर तीन महिन्यांचे प्रगत नि कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना बँका, सूक्ष्म वित्त संस्था आणि स्वयंसेवी संस्थांशी जोडून कर्ज, बाजारपेठ आणि व्यवसाय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

Web Title: Water hyacinth is spreading rapidly in nagpurs lakes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Nagpur News

संबंधित बातम्या

जून महिन्याची ‘थकबाकी’ भरून काढतोय जुलैचा पाऊस; केवळ एका दिवसातच 152.5 मिमी पावसाची नोंद
1

जून महिन्याची ‘थकबाकी’ भरून काढतोय जुलैचा पाऊस; केवळ एका दिवसातच 152.5 मिमी पावसाची नोंद

कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्…
2

कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.