नागपुरात अमानवीय कृत्य! महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार
उपराजधानी नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका विकृत तरुणाने विवाहित महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार केला असून या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक घटनेची माहिती मिळताच नागपूरकर संतापले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. शरीरसंबंधाला नकार दिल्यामुळे रागाच्या भरात तरुणाने महिलाचा खून केला, त्यानंतर मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवल्याचं तपासात उघड झाला आहे.
नागपूरमधी हुडकेश्वरमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी रोहितला बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही मूळची मध्यप्रदेशची आहे. कामाच्या शोधात ६ वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली होती. महिलेचा पती ढाब्यावर आचारी म्हणून काम करतो, तर मुलगी सातवीला आहे. पती सकाळी कामावर गेल्यानंतर मध्यरात्री एक वाजताच घरी येतो. मृत महिलेला दारूचे व्यसन होते, त्यामुळे येथील दोन-चार दारूड्या मुलासोबत तिची ओळख झाली होती. रोहित अन् मृत महिलेची ओळख झाली, त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले.
दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ते वारंवार भेटायचे. नवरा कामावर गेल्यानंतर आणि मुलगी शाळेत गेल्यावर रोहित मृत महिलेला तिच्या घरी भेटण्यासाठी येत होता. गुरुवारीही पती कामावर गेल्यानंतर महिलेने रोहितला फोन करून घरी दारू घेऊन बोलवले. दोघांनी दारु ढोसली आणि जेवण केलं. नशेत असणाऱ्या रोहितने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. पण त्या महिलेने नकार दिला. संतापलेल्या रोहितने गळा दाबून तिचा खून केला. दारूच्या नशेत त्याने मृतदेहासोबत बलात्कार केला अन् पळ काढला.महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
बाप आणि लेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना जालन्यात घडली आहे. इथं एका बापानं आपल्या पोटच्या लेकीवरच अत्याचार केले. ती चौदा वर्षाची आहे. या नराधमाने तिला अश्लील व्हिडीओ दाखवत हे कृत्य केले. जालना शहरातील मोढा परिसरातील हिंदनगरात भागात ही घटना घडली. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने पोलीसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
शहरातील नवीन मोंढा परिसरात ही पिडीत मुलगी आपल्या कुटुंबा बरोबर राहाते. पिडीत मुलीच्या नराधम बापाने पंधरा दिवसापूर्वी हे भयंकर कृत्य केले. त्यावेळी त्याची पत्नी घरी नव्हती. त्यावेळी त्याने ही संधी साधत आपल्या चौदा वर्षीय मुलीला मोबाईलवरील अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक आत्याचार केले. त्यानंतर तिला धमकी ही दिली. या गोष्टीची वाच्यता करू नको. या धमकीमुळे ती मुलगी प्रचंड घाबरली होती. तीने या बाबत कुणालाही काही सांगितले नाही.