Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

मसुदा यादीत नावे समाविष्ट न होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये मतदार दिलेल्या पत्त्यावर न सापडणे, दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे, मृत्यू, इतरत्र पुनर्नोंदणी आणि इतर कारणांचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 01, 2026 | 07:29 AM
निवडणूक आयोगाकडून प्रारूप यादी प्रसिद्ध

निवडणूक आयोगाकडून प्रारूप यादी प्रसिद्ध

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी सोमवारी (दि.३१) प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार नोंदींमधील २ कोटींहून अधिक मतदारांचे नाव या यादीत नाही. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पुनरीक्षणापूर्वी राज्यात ९७८५४०४९ मतदार होते. यापैकी ७७१६५५६२ नावांचा मसुदा यादीत समावेश करण्यात आला आहे.

मसुदा यादीत नावे समाविष्ट न होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये मतदार दिलेल्या पत्त्यावर न सापडणे, दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे, मृत्यू, इतरत्र पुनर्नोंदणी आणि इतर कारणांचा समावेश आहे. प्रारूप अथवा मसुदा यादीत तुमचे नाव नसणे म्हणजे तुमचा मतदानाचा हक्क गमावला आहे असे नाही. पात्र मतदार ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे आणि आक्षेप दाखल करू शकतात. नवीन पात्र मतदारांसाठी फॉर्म ६, आक्षेपांसाठी फॉर्म ७ आणि मतदार यादीतील दुरुस्तीसाठी फॉर्म ८ उपलब्ध आहे.

Pune Election Department : पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार ! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

दरम्यान, उपलब्ध अधिकृत दस्तऐवजात मसुदा यादीत समाविष्ट असलेल्या मतदारांची लिंगनिहाय माहिती दिलेली आहे. सोबत जोडलेल्या अधिकृत परिशिष्ट-२ मध्ये, वगळण्यात आलेल्या किंवा समाविष्ट न करता आलेल्या २०६८८४८७ मतदारांची स्वतंत्र पुरुष-महिला माहिती दिलेली नाही.

4 नोव्हेंबरला अंतिम यादी

दावे आणि आक्षेपांवर प्रक्रिया केल्यानंतर, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर, २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगाच्या या माहितीनुसार, प्रक्रियेसाठी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणी अधिकारी आणि ७,००० हून अधिक सहायक अधिकारी कार्यरत आहेत.

नाव कुठं शोधावं?

नव्या यादीत नाव शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन नाव शोधावे लागणार आहे. त्यातच तुम्हाला नाव आहे की नाही याची माहिती मिळेल. जर नसेल तर यावर हरकत नोंदवावी लागणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.

साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का

सातारा जिल्ह्याच्या मतदार यादीत (Satara Voter List) विशेष सखोल पुनरीक्षणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होताच तब्बल ३ लाख ४१ हजार ९२५ मतदारांचे गणना प्रपत्रच उपलब्ध झाले नसल्याचे समोर आले. यामध्ये १ लाख ९१ हजार ३८३ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित, तर तब्बल ८८ हजार ४९० मतदार मृत असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादीच्या अचूकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Names of as many as 2 crore voters in the state have been removed from the electoral roll

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 07:16 AM

Topics:  

  • Election Commission
  • political news
  • SIR

संबंधित बातम्या

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
1

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप
2

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान
3

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

TMC Symbol History: ममता बॅनर्जींच्या वर्मावर घाव; स्वतः रेखाटलेल्या ‘तृणमूल’चे चिन्हाची खास कहाणी
4

TMC Symbol History: ममता बॅनर्जींच्या वर्मावर घाव; स्वतः रेखाटलेल्या ‘तृणमूल’चे चिन्हाची खास कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.