
काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ, PM मोदी अन् योगींनी माफी मागावी; नाना पटोलेंची मागणी
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, काशी हे केवळ एक शहर नसून हिंदु समाजासाठी अत्यंत मानाचे व पवित्र अध्यात्मिक केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच काशीतून तीनवेळा निवडून आले आहेत. काशीच्या विकासाच्या नावाखाली नरेंद्र मोदी यांनी शेकडो मंदिरे तोडली आणि आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ केला आहे, अहिल्यादेवींची प्रतिमाही तोडली. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला थेट मोक्ष मिळतो, अशी हिंदु धर्मात धारणा आहे, हे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. हिंदु धर्मासाठी पवित्र अशा घाटावर बुलडोझर चालवून मोदी व योगी यांनी हिंदु समाजाचा घोर अपमान केला आहे. तर असे काही घडलेच नाही, जे दाखवले जाते ते एआय (AI) दृश्य आहे असा कांगावा स्वतःला संत म्हणवणारे, भगवे कपडे घालणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत आहेत. होळकर कुटुंबातील काही लोकांनी काशीला जावून वस्तुस्थिती पाहिली व सरकारला पत्र पाठवले आहे. मी उद्या काशीला जाऊन वस्तुस्थिती पाहणार आहे व मोदी – योगी सरकारचा निषेध करणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.
हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
‘दावोस’मधील करारांचे पुढे काय होते?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी यावर्षीही दावोसला गेले आहेत पण ही फक्त इव्हेंटबाजी आहे. याआधीही लाखो कोटी रुपयांचे करार झाल्याचा दावा केला. एवढी मोठी गुतंवणूक राज्यात आली तर मग बेरोजगारी का वाढली, याचे उत्तर द्यावे. राज्यात मोठ्या प्रामणात उद्योग यावेत, ही अपेक्षा आहे पण सरकार करत असलेले दावे आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य कर्जबाजारी झाले आहे, सरकारकडे पगार करण्यासाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. विकासकामासाठी पैसे नाहीत आणि मुख्यमंत्री दावोसमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.