Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

भाजपाचा खरा चेहरा उघडा पडला आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भारतीय जनता पक्ष व विनोद तावडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2024 | 03:06 PM
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असून, पोलीस वाहनातून रसद पाठवल्याच्या बातम्याही आल्या. आतातर भाजपाचे राष्ट्रीय नेते माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचे उघड झाले आहे. भाजपा शिंदे सरकारचा सपशेल पराभव होत असल्याने आता ते भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशाच्या जोरावर जनतेची मते विकत घेऊन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न असून, भाजपाचा खरा चेहरा उघडा पडला आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भारतीय जनता पक्ष व विनोद तावडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी विरारच्या हॉटेल विवांतामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. ही रक्कम ५ कोटी रुपये होती असे सांगण्यात येत आहे, विविध वृत्त वाहिन्यांवरही त्यासंदर्भातील बातम्या दाखवण्यात आल्या. विरारमधील पैसे वाटपाचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, हे प्रकरण दडपण्याचा प्रकार होऊ शकतो पण निवडणूक आयोगाने कोणाच्याही दबावाखाली न येता निष्पक्ष, पारदर्शक व कडक कारवाई करून कायद्याच्या राज्यात सर्व समान आहेत हे दाखवून द्यावे.

हे सुद्धा वाचा : प्रचाराच्या ताेफा थंडावल्या, उमेदवारांनी पिंजून काढला मतदारसंघ; विजयाचा सर्वांचा दावा

विधानसभा निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे परंतु महिना भरातील घटना पाहता सत्ताधारी पक्षांवर कारवाई केली जात नसून फक्त विरोधी पक्षांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या बॅगा तपासणे, त्यांना विमान व हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी न देणे, विलंब लावणे असे प्रकार झाले आहेत. सुरवातीला तक्रारी केल्यानंतर सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात असल्याचे दाखवण्यात आले. खेड शिवापूर भागात पुणे महामार्गावर १५ दिवसापूर्वी एका वाहनातून ५ कोटी रुपये सापडले पण अद्याप ते पैसे कोणाचे हे पोलिसांनी जाहिर केले नाही, या प्रकरणाचे पुढे काय झाले हेही स्पष्ट झालेले नाही. नाशिकच्या एका हॉटेलातही मोठ्या प्रमाणात पैसे सापडले त्याचा संबंधही सत्ताधारी पक्षाशी असल्याचे उघड झाले पण पोलीस कारवाई समाधान कारक झाली नाही. विरोधकांच्या बॅगांमध्ये काहीही आढलेले नाही पण सत्ताधारी पक्षांच्या बॅगांमध्ये पैशांचे घबाड सापडण्याचे प्रकार उघड झाले आहेत. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली व त्यात ते जखमी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे शोभणारे नाही, ऐनकेन प्रकारे निवडणुका जिंकण्याची भाजपा शिंदे युतीचा प्रयत्न जनताजनार्दन खपवून घेणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: Nana patole has made a big demand to the election commission nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Nana patole
  • Vinod Tawde

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.