Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी…”; पोलीस महसंचालकांबाबत नाना पटोलेंची मोठी मागणी

रश्मी शुक्ला यांना त्यांना पदावरून तात्काळ हटवावे, या मागणीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केला आहे. निवडणूक आयोगाला पटोले यांनी पत्र पाठवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2024 | 11:05 AM
नाना पटोलेंवर पैसे घेऊन पदवाटपाचा गंभीर आरोप, दोन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द

नाना पटोलेंवर पैसे घेऊन पदवाटपाचा गंभीर आरोप, दोन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द

Follow Us
Follow Us:

मुंबई : विधानसभेच्या निवडणुका सुरु झाल्या असतानाही निवडणूक आयोगाने अद्याप पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले नाही. काँग्रेस पक्षाने रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती पण त्याकडे आयोगाने दुर्लक्ष केले आहे. पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली असता त्यांना तात्काळ बदलण्यात आले पण महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना याच निवडणूक आयोगाने अद्याप हटवले नाही. रश्मी शुक्ला या वादग्रस्त व भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या अधिकारी आहेत, त्या पदावर असल्याने निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पडतील असे वाटत नाही त्यामुळे त्यांना पदावरून तात्काळ हटवावे, या मागणीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केला आहे.

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, काँग्रेस पक्षाने २४ सप्टेंबर २०२४ व ४ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र पाठवून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. २७ सप्टेंबर रोजी निवडणुक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यांना नाहक त्रास देण्याचे फर्मान पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सोडले आहे, पोलीस यंत्रणा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणत आहेत, धमक्या देत आहेत. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती याआधीही वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांना पोलीस महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आले आणि निवृत्तीनंतरही त्यांना नियमबाह्य पद्धतीने कार्यकाल वाढवून दिला आहे. निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवणे गरजेचे आहे, आयोगाने त्यांना तात्काळ हटवावे, असे नाना पटोले म्हणाले.

फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत

रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.

Web Title: Nana patoles big demand to the election commission regarding the director general of police nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 11:05 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • Nana patole
  • Rashmi Shukla

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
2

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
3

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.