Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेड महापालिकेवर महिला राज; नवा महापौर कोण होणार? या नगरसेविकांची नावे चर्चेत

महापौरपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये महिला राज असणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 23, 2026 | 02:28 PM
Ashok Chavan choice will female mayor of Nanded Waghala Municipal Corporation nanded news

Ashok Chavan choice will female mayor of Nanded Waghala Municipal Corporation nanded news

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेसाठी निवडणूक पार पडली. यानंतर महापौर पदासाठी चुरस रंगली आहे. महापौरपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये महिला राज असणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहराच्या राजकारणात नवे चैतन्य निर्माण झाले आहे.

मुंबई येथे झालेल्या आरक्षण सोडतीत चिठ्ठी काढून हे आरक्षण निश्चित झाल्याने आता नांदेडमधून कोणत्या महिला नगरसेविकेच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी व विरोधी गटांत हालचाली वाढल्या असून अंतर्गत बैठका, गटचचर्चा आणि दिल्ली-मुंबईपर्यंत राजकीय संदेशवहन सुरू झाले आहे. आजपर्यंत नांदेड महापालिकेचे महापौर पद सहा महिलांनी सांभाळलेले आहे. त्यामध्ये मंगलाताई निमकर, ए शमीम बेगम, शैलजा स्वामी, जयश्री पावडे शीला भवरे, मोहिनी येवनकर यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 50 दिवसांपासून बेपत्ता झालेले मंत्र्यांचे सुपुत्र अखेर पोलिसांना शरण! महाड निवडणूक मारहाण प्रकरणात ट्वीस्ट

यावेळी देखील महापौर पदासाठी आरक्षण महिलांचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक नगरसेविकांची नावे चर्चेमध्ये आहे. सध्या महापौरपदासाठी शैलजा स्वामी, जयश्री पावडे यांच्यासह ज्योती कल्याणकर, कविता मुळे, वैशाली देशमुख, –
कविता गड्डूम, सुलोचना काकडे, सुवर्णा बस्त्रदे, सुदर्शना खोमणे आणि अमृताबाई चजरंगसिंह ठाकुर अशी नावे चर्चेत आहेत. यापैकी ज्योती कल्याणकार, वैशाली मिलिंद देशमुख या नगरसेविकांची ही तिसरी टर्म असल्याने त्यांचा दांडगा अनुभव हा मोठा प्लस पॉइंट मानला जात आहे. प्रशासनाचा अभ्यास, सभागृहातील कामकाजाची जाण आणि पक्षांतर्गत समन्वय या बाबींमध्ये अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते,असे संकेत मिळत आहेत.

अशोक चव्हाण म्हणतील तीच महिला महापौर

खासदार अशोक चव्हाण हे कोणाला संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नांदेडमध्ये नव्या महिला चेहऱ्याला संधी देतात की नांदेड महानगरपालिकेची बिघडलेली घडी पूर्ववत आणण्यासाठी अनुभवी महिला चेहरा पुढे आणतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापौर निवडीत वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विशेषतः अशोकर चव्हाण यांच्या पसंतीला महत्व आहे. अशोक चव्हाण म्हणतील तीच महिला महापौरपदावर विराजमान होईल, असा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्याचे तीव्र प्रयत्न  सुरु झाले आहेत.

हे देखील वाचा : आज निष्ठा सहज विकल्या अन् तत्व फेकून दिली जातात…! बाळासाहेबांसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट

नांदेडसाठी काय बदल घडवू शकतात?
महिला महापौर सत्तेवर आल्यास प्रशासनात संवेदनशीलता वाढण्याची अपेक्षा आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, महिला व
बालकल्याण, झोपडपट्टी सुधारणा, अंगणवाडी, शाळा सुविधा आणि महिला सुरक्षेसारख्या समस्यांना अधिक प्राधान्य मिळू शकते. स्वच्छता मोहिमा, महिला स्वयंरोजगार गटांना प्रोत्साहन, कौशल्य विकास, तसेच महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो. राजकीयदृष्ट्‌या पाहता, महिला नेतृत्वामुळे समन्वयाची भाषा, संवादकौशल्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक ठळक होण्याची शक्यता असते. विरोधकाशी टोकाचा संघर्ष टाळून विकासकेंद्री राजकारण पुढे नेण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे नांदेडमध्ये महिलाराज” केवळ घोषणाचे न राहता, प्रत्यक्षात शहराच्या कारभारात सकारात्मक परिवर्तन घडेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Web Title: Ashok chavan choice will female mayor of nanded waghala municipal corporation nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics
  • political news

संबंधित बातम्या

Railway News : नांदेड रेल्वे विभागात ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’; दोन टू-व्हीलर, शस्त्रे पोलिसांनी केली जप्त
1

Railway News : नांदेड रेल्वे विभागात ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’; दोन टू-व्हीलर, शस्त्रे पोलिसांनी केली जप्त

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; नांदेड जिल्ह्यात हॉटेल व छोट्या व्यावसायिकांची मोठी पंचाईत
2

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; नांदेड जिल्ह्यात हॉटेल व छोट्या व्यावसायिकांची मोठी पंचाईत

खेड पंचायत समितीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा; बाबाजी काळेंची रणनीती ठरली यशस्वी
3

खेड पंचायत समितीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा; बाबाजी काळेंची रणनीती ठरली यशस्वी

मुद्रांक विक्रेत्यांनी वकिलांच्या मागणीकडे फिरवली पाठ; नागरिकांमधून नाराजीचा सूर
4

मुद्रांक विक्रेत्यांनी वकिलांच्या मागणीकडे फिरवली पाठ; नागरिकांमधून नाराजीचा सूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.