महाड नगरपरिषद निवडणूक मारहाण प्रकरणी भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे पोलिसांना शरण आले आहे (फोटो - सोशल मीडिया)
महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी झालेल्या राड्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे पसार होते. न्यायालयामध्ये हजर होत नसल्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर विकास गोगावले हे हजर झाले आहेत.
हे देखील वाचा : 16 वर्षांच्या खालील मुलांना सोशल मीडिया बंदी; आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय
मागील महिन्यात, २ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले. महाडमध्ये मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्यादरम्यान विकास गोगावले यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. तसेच रिव्हॉल्व्हर रोखल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.
हे देखील वाचा : कोकणकरांसाठी खुशखबर! दावोसमध्ये तब्बल ३ लाख कोटींचे करार; उदय सामंत यांची माहिती
राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण
या घटनेनंतर महाड पोलिसांनी विकास गोगावले यांच्यावर कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून विकास गोगावले फरार होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांनी पोलिसांत हजर होऊन जामीन मिळवणे अपेक्षित होते, मात्र ते अनेक दिवस फरार राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. यानंतर आता 50 दिवसांनंतर विकास गोगावले हे पोलिसांसमोर हजर झाले आहेत.






