Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावरील सीताखंडी घाटात गुरुवारी (दि. १०) सायंकाळी ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 12, 2026 | 01:40 PM
'त्या' अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

'त्या' अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • ‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत
  • जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा
  • पालकमंत्री सावे यांचे निर्देश
भोकर : भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावरील सीताखंडी घाटात गुरुवारी (दि. १०) सायंकाळी ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जखमींना तातडीच्या उपचारांच्या सूचना

तसेच जखमींना आवश्यक उपचार व वैद्यकीय सुविधा मिळतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या अपघातातील जीवितहानीबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “या दुःखद घटनेत जीवितहानी झाल्याने मनस्वी दुःख झाले. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो,” असे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

उपचारांचा आधार

अपघातातील मृत व्यक्तींच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली असून त्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

 गोंदिया-बालाघाट मार्गावर भीषण अपघात

गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर नागरा परिसरात ट्रक आणि बोलेरो प्रवासी वाहनाची समोरासमोर झालेली भीषण धडक झाली. या अपघातात बोलेरोमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी प्रवाशांपैकी बहुतांश जण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Web Title: Atul save has issued instructions to provide assistance to the families affected by the accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • CM Devedra Fadnavis

संबंधित बातम्या

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
1

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न
2

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न

Rani Mukerji: मराठमोळ्या लूकमध्ये राणी मुखर्जीने वेधलं लक्ष; पुरस्कार स्वीकारताना मराठीत केली भाषणाची सुरुवात
3

Rani Mukerji: मराठमोळ्या लूकमध्ये राणी मुखर्जीने वेधलं लक्ष; पुरस्कार स्वीकारताना मराठीत केली भाषणाची सुरुवात

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
4

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.