Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्याला मारहाण करत रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहारातून पैसे लुटणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 21, 2026 | 01:45 PM
विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात

Follow Us
Follow Us:

नांदेड : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्याला मारहाण करत रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहारातून पैसे लुटणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका प्रमुख आरोपीसह तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यातील १ लाख ३६ हजार ६३३ रुपयांचा शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

१८ जुलै रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजण्याच्या सुमारास यशवंत महाविद्यालय परिसरातून एका अल्पवयीन विद्यार्थ्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे त्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम हिसकावण्यात आली. तसेच त्याच्या मोबाईलमधील फोनपेद्वारे जबरदस्तीने पैसे हस्तांतरित करून घेण्यात आले. याप्रकरणी १९ जुलै रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोउपनि विनोद देशमुख आणि गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोटारसायकलीचा क्रमांक आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. काही तासांतच चारही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

हे सुद्धा वाचा : साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली; 2 महिलांना अटक

मुद्देमाल केला जप्त

या कारवाईत मुख्य आरोपी अथर्व अनिल गायकवाड (वय १९, रा. आंबेडकर नगर, नांदेड) याच्यासह तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम, फोनपेच्या माध्यमातून घेतलेली रक्कम, गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ३६ हजार ६३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक महेश माळी, पोउपनि विनोद देशमुख, नरेश वाडेवाले तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली असून तपास विनोद देशमुख करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : वडगावातील एमआयडीसी रस्त्यावर पार्किंगचा विळखा, वाहतूक कोंडीमुळे अपघाताची भीती; तातडीच्या कारवाईची मागणी

एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर स्वतःला पोलिस असल्याचे सांगत एका व्यावसायिकाकडील तब्बल एक कोटी रुपयांची रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. दुचाकीवर पाठलाग करून कार अडवून “तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात,” अशी बतावणी करत आरोपींनी रोख रक्कम असलेल्या बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The police have detained three individuals who kidnapped and robbed a student

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • nanded news

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
1

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
2

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
3

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
4

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.