Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…

भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी असलेले सुनील मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मोरे यांच्या पत्नीही हिमायतनगर तालुक्यात शिक्षिका असल्याचे समजते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2026 | 08:33 AM
रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

Follow Us
Follow Us:

नांदेड : एका तणावग्रस्त शिक्षकाने नांदेड शहराजवळ धावती कार गोदावरी नदीपात्रात कोसळवून दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेनंतर खळबळ उडाली आहे. सुनील नारायण मोरे (वय ४२) असे या शिक्षक पित्याचे तर, सारा (वय १३) आणि सुमीत (वय १०) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.

शुक्रवारी सकाळी दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडलेल्या मोरे यांनी आपली बलेनो कार त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या पुणेगाव (ता. नांदेड) येथील गोदावरीच्या पुलावर नेली. सकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांनी थेट गोदावरीत जलसमाधी घेतली. पोलिस, एनडीआरएफने वाहन बाहेर काढल्यानंतर तिघांचे मृतदेह हाती लागले.

आईसोबत पैशांवरून वाद होताच मुलगा नैराश्येत; पाचव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी असलेले सुनील मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मोरे यांच्या पत्नीही हिमायतनगर तालुक्यात शिक्षिका असल्याचे समजते. त्या शाळेशी संबंधित काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कथित मानसिक छळामुळे ते त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. काही अधिकाऱ्यांना पाठिशी घालून एका प्रकरणात मोरे यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न सुरू होता. आत्महत्या करण्यापूर्वी मोरे यांनी निर्दोषत्व सांगणाऱ्या सर्व बाबी त्यांच्या लॅपटॉपमध्ये जतन करून ठेवल्या.

व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले अन्…

मोरे यांनी ‘माझी शाळा भानेगाव’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मी माझ्या मुलांसकट आत्महत्या करत आहे, असा संदेश सोडला होता. त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील स्टेटसमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या काही आजी-माजी अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे. त्यांच्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे, असे म्हटले होते.

मानसिक छळाचे आरोप

लॅपटॉपमधील नोटमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी सुरेखा, हिमायतनगरचे गटशिक्षणाधिकारी किसन फुले, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता पावले यांचा उल्लेख करून मानसिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी अद्याप या आरोपांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोदावरीत आत्महत्या करण्यापूर्वी सुनील मोरे यांनी मित्राला फोन केला होता.

Dhule Crime : ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

Web Title: Teacher commits suicide driven to despair by harassment from superiors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • nanded news
  • Suicide case

संबंधित बातम्या

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल
1

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

शासकीय कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
2

शासकीय कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.