
No-confidence motion against Pathri APMC Director Anil Nakhate Nanded News
नांदेड : उध्दव इंगळे : पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठा राजकीय स्फोट झाला आहे. सभापती अनिल नखाते यांच्या विरोधात अखेर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून, या ठरावावर तब्बल १२ संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेने पाथरी तालुक्याच्या राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम २३ (अ) नुसार शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे दाखल करण्यात आला.
या ठरावावर सही करणारे संचालकांमध्ये एकनाथ रामचंद्र घांडगे, किरण भागिरथ टाकळकर, संतोष जगन्नाथ गलबे, संजीव मारोत सत्वधर, गणेश सखाराम दुगाणे, शेख दस्तगीर शेख हसन, शाम उत्तम धर्मे, विजयकुमार तुळशीराम शिताफळे, अशोक उत्तमराव आरबाड, संदीप शिवाजी टेंगसे, आनंद लक्ष्मण धनले आणि स. गालेब स. इस्माईल, तेरावे संचालक अमोल बांगड हे परराज्यात असल्याने त्यांची स्वाक्षरी ठरावावर नसली, तरी त्यांनी ठरावाच्या बाजूने भूमिका घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
ठरावातील केलेले आरोप
सभापती अनिल नखाते यांच्या विरोधात दाखल ठरावात त्यांच्यावर मनमानी कारभार, संचालकांचा विश्वासघात, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकतेचा अभाव तसेच स्वतःच्या कुटुंबीयांना योजनांचा लाभमिळवून देणे यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठरावात नमूद करण्यात आले आहे की -“सभापतींनी बाजार समितीच्या हिताचे दुर्लक्ष करून वैयक्तिक स्वार्थासाठी निर्णय घेतले असून, व्यामुळे त्यांनी संचालकांचा विश्वास गमावला आहे.
राजकीय पार्श्वभूमी आणि नवी समीकरणे
या ठरावावर स्वाक्षरी करणाऱ्या अर्ध्याहून अधिक संचालकांचा संबंध माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या गटाशी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, शिवसेना (शिंदे गट) नेते सईद खान यांच्या गटातील काही संचालकांनीही ठरावावर सही केली आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकारणात कायमचा मित्र-शत्रू नसतो एकेकाळी दुर्राणी यांनीच अनिलराव नखाते यांच्या पत्नी भावना नखाते यांनी जिल्हा परिषद उपसभापतीपद मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. त्या निवडणुकीत विजयसाठी त्यांनी स्वतः परिश्रम घेतले होते. मात्र आज, त्याच दुर्राणीनी अनिलरावांवरच अविश्वास प्रस्ताव आणत’ राजकीय हिशेब चुकता केल्याची चर्चा रंगली आहे. या घडामोडींमुळे जुनी म्हण पुन्हा खरी ठरली राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. दुर्राणी यांनी केलेल्या या हालचालीमुळे पाथरी तालुक्यातील राजकीय समीकरणांची नव्याने जुळवाजुळव सुरू झाली आहे.
बाबाजानी दुर्राणी यांचा पहिला ‘राजकीय वार’
दरम्यान, सईद खान याना या ठरावाची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याची माहिती आहे. त्यांच्या गटातील काही संवालकांनी त्यांना विश्वासात न घेता ठरावावर स्वाक्षऱ्या केल्याचे समजते, तराद दाखल केल्यानंतर सर्व संचालक सहलीसाठी रवाना झाल्याची बातमी समोर आल्यानंतर पाथरी तालुक्यात राजकीय चर्वांना चांगलाच ऊत आला आहे.
या संपूर्ण घटनेत सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे माजी आमदार बाबाजानी दुरोणी हे ठराव दाखल करताना स्वत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. नुकतेच त्याच्याकडे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद सोपवण्यात आले असून, अध्यक्षपद मिळाल्यानंतरच्या दुसऱ्याव दिवशी त्यांनी आपल्या राजकीय रणनीतीचा पहिला वार करून जिल्ह्यातील समीकरणे हलवून सोडली आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विधानसभा निवडणुकीच्या काळात अनिलराव नखाते यांनी दुर्राणी यांना साथ न देता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत राहणे पसंत केले होते. दरम्यान, दुर्राणी यांचा अजित पवार याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश ठरला होता. पाथरी शहरात स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, परंतु ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला त्यानंतर त्यांना बराच काळ ताटकळत ठेवण्यात आल्याचे शल्य दुरोणीच्या गोटात असल्याची बर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती
पुढील चित्र काय ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश विटेकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अनिलराव नखाते आता या ठरावावर कोणती भूमिका घेतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे