Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Sukhbir Singh Badal: शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर गुरुवारी नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिबजवळ हल्ला झाला. या घटनेत त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2026 | 06:05 PM
नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • तख्त श्री हजूर साहिबजवळ सुखबीर बादल यांच्यावर हल्ला
  • उजव्या हाताला दुखापत, प्रकृती स्थिर
  • सुखबीर बादल यांच्यावरील हल्ल्याने खळबळ
Sukhbir Singh Badal: शिरोमणी अकाली दलाचे (SAD) प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर गुरुवारी (13 ऑगस्ट 2026) नांदेडमध्ये हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. हा हल्ला तख्त श्री हजूर साहिबजवळ झाला. घटनेनंतर बादल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

हल्ल्याचा व्हिडीओ समोर

घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सुखबीर सिंह बादल यांना एका इमारतीच्या दिशेने नेण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या उजव्या हाताला कापड बांधलेले असल्याचेही या दृश्यांमध्ये दिसून येते. पक्षाच्या प्रवक्त्यांनी बादल यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ दुखापत झाल्याचे सांगितले असून ते धोक्याबाहेर असल्याचे म्हटले आहे.

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

पत्नी हरसिमरत कौर बादलही सोबत

हल्ल्याच्या वेळी सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल उपस्थित होत्या. बादल हे नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब येथे गेले होते. त्याचवेळी ही घटना घडली.

आरोपीला तात्काळ अटक

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. उपलब्ध माहितीनुसार आरोपीचे नाव जसपाल सिंह असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने कृपाणच्या सहाय्याने बादल यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. हल्ल्यामागचा नेमका हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून माहिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली आणि हल्ल्यामागील उद्देशाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले. फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बादल यांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले.

राजकीय वर्तुळातून निषेध

हल्ल्याच्या घटनेनंतर शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अकाली दलाने या घटनेची सखोल आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. राजकीय मतभेद असले तरी हिंसेला लोकशाहीत स्थान नसल्याची प्रतिक्रिया भाजपकडूनही देण्यात आली आहे.

गृह राज्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचे आश्वासन

राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही या घटनेची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून हल्ल्यामागे नेमका कोणता हेतू होता आणि सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी राहिल्या का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. घटनेनंतर तख्त श्री हजूर साहिब परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे.

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

Web Title: Sukhbir singh badal attacked nanded takht hazur sahib devendra fadnavis probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Nanded

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
1

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
2

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
3

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.