राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरण आणि अजित पवार विमान अपघात चौकशीबाबत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली (फोटो - सोशल मीडिया)
आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद
रोहित पवार यांचे अजित पवारांच्या अपघातावर भाष्य
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
Maharashtra Politics : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती (Ajit Pawar Plane Crash) निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र या अपघाताचे गूढ अद्याप समोर आलेले नाही. विमान अपघाताबाबत माहिती देऊ शकणारा ब्लॅक बॉक्स हा जाळला गेला असल्याचे देखील माहिती समोर आली आहे. यामुळे संशयाचे वारे वाहत आहेत. दरम्यान, यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे.
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या मृत्यूचे कारण समोर येणे हे अधिक महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर विलीनीकरणाबाबत देखील रोहित पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “आता विषय इतकाच आहे की, ब्लॅक बॉक्स जळला कसा आणि तो भारताच्या बाहेर पाठवला गेला. हा जो काही विषय आहे, तो महत्वाचा आहे. अनेक लोक म्हणतात की, म्हणतात की, तुम्ही विलिनीकरणाबाबत प्रेस घेणार होतात.आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण दुय्यम आहे. आज कुठल्या गोष्टीला महत्व आहे तर दादांच्या तपासाला, या गोष्टीवर आम्ही फोकस करून आहोत. आता विषय कोणता महत्वाचा आहे तर तो अपघाताचा. अपघाताची चाैकशी होणे हेच महत्वाचे आणि यावरच आमचा फोकस आहे,” अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.
हे देखील वाचा : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का यावरुन जोरदार राजकीय चर्चा रंगल्या आहेत. याबाबत रोहित पवार म्हणाल्या की, “आमदारांना बोलवतात रांगेत बसवतात आणि त्यांना सांगतात बाहेर विलिनीकरणाबद्दल बोलू नका. अजितदादा एनडीए बरोबर जाणार होते की, दादाबाहेर रस्त्यावर येऊन आमच्यासोबत संघर्ष करणार होते. हे आमच्यात ठरलेलं. आज दादा नाहीत, त्यामुळे या विषयावर चर्चा करणं गौण आहे. आमच्याकडून या विषयावर पूर्णविराम लागलेला आहे,” अशी स्पष्ट भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट
पुढे ते म्हणाले की, “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च महत्व टिकवून ठेवायचं आहे, सारखा सारखा तो विषय काढतात. सोपा विषय आहे, अजितदादा जयंत पाटील यांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील यांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे. दीडवर्षातलं सीसीटीव्ही फुटेज काढा. 13-14 वेळा भेटले ते समजेल” असा रोहित पवार यांनी दावा केला.






