Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

न्यायालयात नागरिकांचे वाद कायद्याच्या चौकटीत सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या दोन महिला वकिलांमध्येच न्यायालय परिसरात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने भोकर शहरासह न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 27, 2026 | 01:49 PM
दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

भोकर : न्यायालयात नागरिकांचे वाद कायद्याच्या चौकटीत सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या दोन महिला वकिलांमध्येच न्यायालय परिसरात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने भोकर शहरासह न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. २४ जून २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही महिला वकिलांनी एकमेकीविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंद केले आहेत.

 

ॲड. सोनकांबळे आणि ॲड. राठोड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांवरून मतभेद सुरू होते. यापूर्वी काही ज्येष्ठ वकिलांनी मध्यस्थी करून दोघींमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, २४ जून रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास न्यायालयीन कामकाजादरम्यान पुन्हा दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला जाऊन झटापट आणि हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले असून, घटना घडताच न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली होती. न्यायालयीन कामासाठी आलेले पक्षकार, नागरिक आणि इतर वकील यांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना वेगळे केले. या वादामुळे काही काळ न्यायालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ॲड. सोनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत ॲड. राठोड यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून जातीवाचक शब्दांचा वापर करत अपमान केल्याचा आरोप केला आहे.

हे सुद्धा वाचा : वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई; टाकवे बुद्रुक येथे गांजासह प्रतिबंधित पानमसाला जप्त

न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर

या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हाके करत असून दुसरीकडे, ॲड. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत ॲड. सोनकांबळे यांनी शिवीगाळ करून झटापट केली, हातातील पर्स हिसकावून त्यातील १,५०० रुपये काढून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सागर झाडे पुढील तपास करत आहेत.

घटनेनंतर न्यायालयीन वर्तुळात या प्रकरणाची दिवसभर चर्चा सुरू होती. काही ज्येष्ठ विधिज्ञांनी अशा घटनांमुळे वकिली व्यवसायाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे. न्याय मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘जे इतरांना कायद्याचा मार्ग दाखवतात, त्यांनीच संयम गमावणे योग्य नाही. अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ नये,’ अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: A shocking incident involving a physical altercation between two female lawyers has occurred in bhokar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Bhokar
  • crime news
  • nanded news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.