Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambajogai Municipal Council: अंबाजोगाई नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा; शहराच्या विकासाची नव्याने  सुरुवात

 गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असूनही सत्तेच्या पदांपासून दूर राहिलेले जनसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी सोमवारी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार रितसर स्वीकारला.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 07, 2026 | 05:00 PM
Ambajogai Municipal Council: अंबाजोगाई नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा; शहराच्या विकासाची नव्याने  सुरुवात

Ambajogai Municipal Council: अंबाजोगाई नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा; शहराच्या विकासाची नव्याने  सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:
  • नंदकिशोर मुंदडा नगराध्यक्षपदी विराजमान
  • रमाई आवास योजनेच्या धनादेशावर केली सही
  • अंबाजोगाई शहरातून निघाली भव्य मिरवणूक
 

Ambajogai Municipal Council: गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असूनही सत्तेच्या पदांपासून दूर राहिलेले जनसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी सोमवारी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार रितसर स्वीकारला. या ऐतिहासिक क्षणाचे स्राक्षीदार होण्यासाठी अंबाजोगाईकरांनी शहरात जणू जनसागर उसळला होता. पदभार स्वीकारल्यानंतर मुंदडा यांनी सर्वप्रथम रमाई आवास योजनेच्या हप्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करून आपल्या कारभाराचा श्रीगणेशा केला. यातून त्यांनी सामान्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे स्पष्ट संकित दिले.

या पदग्रहण सोहळ्यानिमित्त शहर परिवर्तन जनविकास आघाडी’ च्या वतीने शहरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. दोन तासांचा नियोजित मार्ग कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पार करण्यासाठी तब्बल पाच तास लागले. उघड्या जीपमध्ये बसलेल्या नंदकिशोर मुंदडा यांना ठिकठिकाणी क्रेनच्या साहाय्याने हार घालण्यात आले, तर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली, महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

मुख्य सोहळ्यात मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी नंदकिशोर मुंदडा यांचे स्वागत करून पदभार सुपूर्द केला. आयुष्याची उमेदीची वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता जनतेसाठी झिजवलेले ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा जेव्हा नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले, तेव्हा हा केवळ राजकीय पदग्रहणाचा कार्यक्रम न राहता अंबाजोगाईकरांच्या कृतज्ञतेचा उत्सव ठरला. यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचेही नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या सोहळ्यामुळे अंबाजोगाईच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पन्नगेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अक्षय मुंदडा यांनी प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या. अंबाजोगाई नगरपालिका राज्यात प्रथम क्रमांकावर यावी, कर वसुलीत पारदर्शकता असावी, मासिक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण व्हावे तसेच दरमहा प्रभागनिहाय जनता दरबार भरवून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, अशा सूचना त्यांनी केल्या, भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा: “विलासराव देशमुख आठवणी पुसल्या जातील…लातूरमधील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरुन रंगलं राजकारण

नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाईकरांचे आभार मानताना भावनिक उद्रार काढले. ते म्हणाले की, ही माझ्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची संधी असून मी माझ्या नावावर कोणताही डाग लागू देणार नाही. ‘गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट’ या सूत्रावर कर्मचारी व नगरसेवकांनी काम करावे. आपण स्वतःचे सर्व कर आधी भरणार असून त्यानंतरच नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समर्थक असो वा विरोधक, प्रत्येकाचे काम नियमानुसार व सन्मानाने केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नगरपालिकेत एका नावा युगाची सुरुवात होत असून प्रशासन आणि नगराध्यक्ष है रणाच्या दोन चाकांप्रमाणे एकत्रितपणे शहराच्या विकासाचा गाडा पुढे नेतील. नगर परिषद प्रशासनाकडून नगराध्यक्षांना पूर्ण सहकार्य यहील, असे मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी सांगितले.

Web Title: Nandkishore mundada elected as ambajogai municipal president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Latur
  • Politics

संबंधित बातम्या

Latur crime: लातूरमधील नवोदय आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; बाथरूमच्या भिंतींवर हृदयाचे…; अनुष्कासोबत नेमकं काय घडलं?
1

Latur crime: लातूरमधील नवोदय आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; बाथरूमच्या भिंतींवर हृदयाचे…; अनुष्कासोबत नेमकं काय घडलं?

Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
2

Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Latur Crime: लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात, पोलीस तपास सुरू
3

Latur Crime: लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात, पोलीस तपास सुरू

Latur Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी, फोटोग्राफरकडून वारंवार अत्याचार; 16 वर्षीय अनाथ मुलीने उचलला टोकाचा पाऊल
4

Latur Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी, फोटोग्राफरकडून वारंवार अत्याचार; 16 वर्षीय अनाथ मुलीने उचलला टोकाचा पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.