Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदुरा रौप्य महोत्सव: भक्तिरसात न्हालेलं शहर, महाप्रसाद व भव्य शोभायात्रा आकर्षण

नांदुरा येथे रौप्य महोत्सवानिमित्त धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल सुरू आहे. १०५ फूट हनुमान मूर्तीच्या २५ वर्षांनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली असून परिसर भक्तिमय झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 29, 2026 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला
  • दुपारी १२:३० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन
  • वाद्य पथक सहभागी होणार असून, हे विशेष आकर्षण ठरणार
रौप्य महोत्सवानिमित्त नांदुरा नगरीत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे. शहराची ओळख ठरलेल्या १०५ फूट उंच हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असल्याने ‘हनुमान जयंती व ब्रह्मोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने देशभरातून हजारो भाविक नांदुरात दाखल होत असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला आहे.

Ahilyanagar News: सत्ताधारीच म्हणतात माळीवाडा वेस पाडा! 57 नगरसेवकांच्या सह्या असलेले निवेदन महापौरांना सादर

या महोत्सवाचे आयोजन श्री तिरुपती बालाजी संस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवारपासून ४ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांची मालिका राबविण्यात येत आहे. यामध्ये अखंड होमहवन, पूजाविधी, भजन-कीर्तन यांसारख्या उपक्रमांचा समावेश असून, भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्य सोहळा गुरुवारी पार पडणार आहे. सकाळी १० वाजता हनुमानजींना माल्यार्पण करण्यात येणार असून, हा सोहळा बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२:३० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भक्त याचा लाभ घेणार आहेत.

रेडलाईनची ‘डेडलाईन’ फिक्स! नक्षलमुक्तीचे काऊंटडाउन, जनतेमध्ये भय कायम

सायंकाळी ५ वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत केरळमधील पारंपरिक वेशभूषा पथक आणि वाद्य पथक सहभागी होणार असून, हे विशेष आकर्षण ठरणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण नांदुरा शहर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सर्व हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष फनेंद्र उरिमी तसेच नांदुरा नगरीतील नागरिकांनी केले आहे. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम घडवणारा हा महोत्सव नांदुरासाठी विशेष ठरणार आहे.

Web Title: Nandura silver jubilee festival a city immersed in devotional fervor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:15 AM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News:कर्जमुक्ती योजना; पालकमंत्र्यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा, नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
1

Buldhana News:कर्जमुक्ती योजना; पालकमंत्र्यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा, नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

Buldhana News: दोन कोटींचा ‘डिजीटल गंडा’; २ आरोपी अटकेत सायबर पोलिसांची कारवाई, ज्येष्ठाची फसवणुक प्रकरण
2

Buldhana News: दोन कोटींचा ‘डिजीटल गंडा’; २ आरोपी अटकेत सायबर पोलिसांची कारवाई, ज्येष्ठाची फसवणुक प्रकरण

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक
3

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर
4

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.