Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : विद्यार्थ्यांना अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा

Nagpur News : नागपुरात विद्यार्थ्यांना अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, गीतांजली बूटी मंगळवारी तपासाचा आढावा घेणार आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 17, 2026 | 04:30 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • बालहक्क आयोगाकडून तपासाचा आढावा
  • १०९८ हेल्पलाइनवरून प्रकार उघड
  • ब्लॅकमेलिंगच्या शक्यतेचाही तपास
Nagpur News : कामठी येथील एका खासगी जेईई-नीट शिकवणी वर्गातील महिला कर्मचाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थ्यांना स्वतःची अश्लील फोटो आणि व्हीडिओ पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्हॉट्स अॅपसह समाजमाध्यमांद्वारे ही सामग्री विद्यार्थ्यांना पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची बालसाहाय्य कक्षाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर जुनी कामठी पोलिसांनी संबंधित २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या गीतांजली बूटी मंगळवारी तपासाचा आढावा घेणार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कामठीतील खासगी जेईई-नीट शिकवणी वर्गात कार्यरत आहे. जुलै महिन्यात तिने स्वतःचे अश्लील फोटो आणि व्हीडिओ तयार करून शिकवणी वर्गातील अनेक अल्पवयीन विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅपसह समाजमाध्यमांद्वारे पाठविल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नेमके किती विद्यार्थी प्रभावित झाले आणि ही सामग्री पुढे कोणाकोणापर्यंत पोहोचली,याचा तपास पोलिस करीत आहेत.

Nagpur News : अधिवेशनाच्या लगबगीत दुष्काळी उपाययोजना रखडल्या; १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये

बालहक्क आयोगाकडून तपासाचा आढावा

जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनाही तपास अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह आयोगाच्या सदस्या गीतांजली बूटी यांच्यासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयोगाच्या आढाव्यादरम्यान आतापर्यंत किती विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यात आली, प्रभावित विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलली आणि तपासाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे.

Chandrapur Earthquake : चंद्रपुरात दीड तासात दोन भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट, सुदैवाने जीवितहानी नाही

१०९८ हेल्पलाइनवरून प्रकार उघड

१३ नोव्हेंबर रोजी बालसाहाय्य हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली होती. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी प्राथमिक चौकशीचे निर्देश दिले. बालसाहाय्य कक्षाच्या प्रकरण पर्यवेक्षिका पूजा कांबळे आणि पथकातील सदस्या मीनाक्षी धडाडे यांनी उपलब्ध पुराव्यांची प्राथमिक पडताळणी केली.

त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी जुनी कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला. प्राथमिक तपासात काही छायाचित्रे आणि चित्रफितीही समोर आल्या आहेत.

ब्लॅकमेलिंगच्या शक्यतेचाही तपास

या प्रकरणामागे संघटितपणे चालणारे लैंगिक शोषण किंवा ब्लॅकमेलिंगचे जाळे सक्रिय आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे. काही अल्पवयीन विद्यार्थ्यांशी संबंधित कथित शारीरिक संबंधांच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

Web Title: Nagpur news pocso case obscene videos cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Crime News
  • Nagpur News
  • police POCSO Act

संबंधित बातम्या

Jalgaon News: यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! अवैध सावकारी, दारू, सट्टा अन् वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त
1

Jalgaon News: यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! अवैध सावकारी, दारू, सट्टा अन् वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त

Myanmar News : म्यानमारला मोठा दणका; रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठरवले जबाबदार
2

Myanmar News : म्यानमारला मोठा दणका; रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठरवले जबाबदार

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा
3

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा

Nagpur News : ईडीकडून रेती माफियांची १६ कोटींची मालमत्ता जप्त; नागपूर-भंडाऱ्यात मोठी कारवाई
4

Nagpur News : ईडीकडून रेती माफियांची १६ कोटींची मालमत्ता जप्त; नागपूर-भंडाऱ्यात मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.