Sanjay-Raut-PTI-1
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचार सभेसाठी महाराष्ट्रात येणार आहेत. त्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. संजय राऊत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात तंबू ठोकला आहे. लवकरच त्यांची सभा होणार आहे. छत्रपती शाहू महाराजांचा प्रभाव कमी करण्यासाठी मोदी महाराष्ट्रात येत आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एक दिवस आधीच पोहचले होते.
शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी महाराष्ट्रात येत आहेत
संजय राऊत म्हणाले,शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले. जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. भाजपने त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणे चुकीचे आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोधात निवडून द्यावे. ही आम्ही भूमिका आहे. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे, तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडलीतरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली. नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांविरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
गादीपुढे मोदी काहीच नाही
कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गादी नाही. गादीपुढे मोदी कोणीच नाही. भाजपकडून त्या गादीचा अपमान केला जात आहे. नरेंद्र मोदी शाहू महाराजांचा अपमान करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहेत. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा त्या गादीची आहे. शिवाजी महाराजांचा सन्मान असणारी प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो. महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे त्यावर तुम्ही आघात करत आहात. शिवाजी महाराजांच्या गादीविरोधात तुम्ही प्रचाराला महाराष्ट्रात आला आहात, असे म्हणत संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे.