Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरेगाव तालुक्यात रंगणार तिरंगी सामना; जिल्हा बँक सोसायटी मतदारसंघांसाठी नरसिंग दिसले मैदानात

कोरेगाव दक्षिण भागात 23 सोसायटी मतदार आहेत. हा भाग कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आहे. या ठिकाणी भाजप आमदार मनोज घोरपडे नेतृत्व करत आहेत. मात्र, या भागात राष्ट्रवादी अजित पवार गट ही भक्कम आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 21, 2026 | 11:43 AM
अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

Follow Us
Follow Us:

कोरेगाव / संजय कदम : सातारा जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असून, बँकेसाठी सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या सोसायटी मतदारसंघासाठी कोरेगाव तालुक्यातून भाजप-शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सुनील माने, तसेच शशिकांत शिंदे यांचे निष्ठावंत शिलेदार नरसिंग दिसले यांची नावे चर्चेत आहेत.

कोरेगाव तालुका हा तीन भागात विभागला असल्याने या तिन्ही ठिकाणची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कोरेगाव उत्तर भाग हा फलटण विधानसभा मतदारसंघात आहे. या ठिकाणी 27 सेवा सोसायटी मतदार आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील या मतदारसंघांचे नेतृत्व करत आहेत. याशिवाय, हा भाग अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. याच भागात अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळंस्कर यांचा मोठा राजकीय गट आहे.

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निबाळकर, भाजप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबालकर, जिल्हा परिषद सदस्य भाजप नेते अमित चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्या जयश्री राजेंद्र भोसले, भाजप नेते शहाजी भोईटे असे राजकीय दिग्गज या भागाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या भागातील सोसायटी मतदार वळवण्यात कोण यशस्वी ठरणार? हे आगामी काळात स्पष्ट होईल. सध्या तरी या भागात समसमान ठराव होतील, अशी परिस्थिती आहे.

कोरेगाव मध्य भागात एकूण 40 सोसायटी मतदार आहेत. या ठिकाणी आमदार महेश शिंदे नेतृत्व करत आहेत. या भागातील दोन्ही जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, आमदार महेश शिंदे यांच्या विचाराचे आहेत तर या भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार नितीन काका पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा गट आहे.

याशिवाय, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्या जयश्री राजेंद्र भोसले, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य निलेश जगदाळे, कोरेगाव पंचायत समिती सभापती राजे, तर कोरगावमधून आमदार महेश शिंदे गटाचे जिल्हा बँक संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन सदस्य राहुल बर्गे, युवा नेते किरण बर्गे, कोरेगाव नगराध्यक्ष रूपाली महेश बर्गे अशी मोठी राजकीय फळी आहे. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. सध्या राजकीय परिस्थिती पाहता या ठिकाणी समसमान ठराव जातील, अशी चर्चा आहे.

कोरेगाव दक्षिण भागात 23 सोसायटी मतदार

कोरेगाव दक्षिण भागात 23 सोसायटी मतदार आहेत. हा भाग कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आहे. या ठिकाणी भाजप आमदार मनोज घोरपडे नेतृत्व करत आहेत. मात्र, या भागात राष्ट्रवादी अजित पवार गट ही भक्कम आहे. रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनील माने हे या ठिकाणी किंगमेकर ठरतील अशी परस्थिती आहे. याशिवाय, या भागात दोन्ही जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. याशिवाय माजी मंत्री व सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा गट आहे. त्यामुळे हा भाग राष्ट्रवादी उमेदवास फायद्याचा ठरणार आहे.

निविदा प्रक्रिया पारदर्शक; ७५ लाखांची बचत केली, घोटाळ्याचा प्रश्नच नाही : नगराध्यक्ष अनिल सावंत

Web Title: Narsing disale entered the fray for the district bank society constituencies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Satara District Bank Election
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा
1

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
2

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
3

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
4

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.