
भुजबळ, कोकाटे 'समृद्धी'च्या प्रेमात, भुसेंना रेल्वेचा आधार (फोटो सौजन्य-X)
नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, महामार्गावरील खड्डे, जागोजागी सुरू असलेल्या कामांमुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी सहा तासांचा मोजावा लागणारा कालावधी पाहता नाशिकच्या मंत्र्यांना नाशिकलाच टाळून मुंबई गाठणे अधिक सोपीस्कर वाटू लागले आहे. मंत्री छगन भुजबळ असो की माणिकराव कोकाटे यांनी ‘समृद्धी’ चा नवीन विस्तारीत मार्गाचा वापर करून परस्पर मतदार संघ गाठण्यावर भर दिला आहे. तर दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी नाशिकहून मुंबईला वाहनाने प्रवासच नको, असा पण करून मनमाड असो वा नाशिक मार्गे रेल्वेलाच पसंती दिली आहे, मंत्री झिरवाळ यांना कोणताही पर्याय नसला तरी, इगतपुरी तालुक्यातील भरवीर पर्यंत समृद्धीने भरधाव प्रवास करून पुढे गधके खात मतदार संघ गाठावा लागत आहे.
नाशिकचे आमदार, खासदारांना समृद्धी जवळचा वाटू लागला आहे. नाशिक ते भरवीरपर्यंत या मार्गावर पोहोचणे सहज शक्य होऊ लागले त्यातून मुंबई जवळची वाटू लागली आहे. त्यामुळे जुन्या महामागनि जाणे जवळपास सर्वांनीच टाळणे सुरू केल्यामुळे या मार्गावरील वाहतूकीवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु पुढे ठाण्यापासून मुंबई गाठण्यात होत असलेला विलंब काही टळण्यास कमी नाही.
नाशिकहून मुंबई गाठायचे म्हटल्यास चारचाकीतील प्रवाशांच्या पोटात गोळा उठू लागला आहे. उरुणपुलाचा वापर करून नाशिकसोडणं सुकर मानले जात असले तरी, पुलावर सध्या सुरू असलेल्या कामामुळे एकबाजूच वाहनांसाठी मोकळी सोडली गेली आहे. त्यातून मार्ग काढून विल्होळी, वाडीव-हें गाठत पुढे जावे तर मुंबेगावापासूनच वाहतूक कोडीला सुरुवात होत आहे. घोटी टोलनाका पास करेपर्यंत साधारण तास, सव्यातासाचा कालावधी लागत आहे. पुढे पुढे तर प्रवासच नको अशी अवस्था झाली असून, काही किलोमीटरवर सहापदरीचे सुरू असलेले कामे तर काही ठिकाणी समृद्धीचे कामे सुरू असल्याने भिवंडी सुटेपर्यंत तेथील गोदामातून निघणाऱ्या छोटाहती सारख्या वाहनांनी चारचाकीची दमछाक होते, पुढे कल्याण फाटा, अंगूर फाटा व ठाण्यापर्यंतचा प्रवास मुंगीच्या पावलाने करण्यास भाग पडते. त्यामुळे हल्ली व्यावसायिक बहने सोडल्यास खासगी व शासकीय वाहनासाठी समृद्धी महामार्ग वरदान ठरू लागला आहे.
मंत्री छगन भुजबळ हे ठाण्यापासून समृद्धीने थेट कोपरगावहून येवल्याला प्राधान्य देवू लागले आहेत. येवल्यात मतदार संघातील कामे आटोपून निफाड मार्गे येण्याऐवजी पुन्हा कोपरगाव मार्गे सिन्नर व तेथून नाशिक गाठण्यास प्राधान्य देत आहेत. मंत्री माणिकराव कोकाटे यांना तर मुंबईहून थेट समृद्धी मागांने सिन्नरपर्यंत पोहोचण्याची सोय झाली आहे. तेथूनच ते पुन्हा मुंबई गाठतात. मंत्री दादा भुसे यांना मात्र रस्ता मार्ग जवळपास वर्ज्य झाला आहे. मनमाडहून राजधानी असो वा वंदेभारत आदी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे त्यांना जवळच्या झाल्या आहेत. येतांनाही त्यांनी याच मार्गाला पसंती दिली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांना मात्र समृद्धीचा पर्याय भरवीरपर्यंत असला तरी, तेथून पुढे नाशिकला जुन्या महामागनिच त्यांना प्रवास करावा लागत आहे.