Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: धक्कादायक! खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन हवेतच, मुदत संपल्यानंतर उच्च न्यायालयाच्या कडक सूचना

राज्यातील खड्डेमुक्त रस्त्यांच्या कामासाठी दिलेली मुदत संपल्यानंतरही अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. बांधकामातील हलगर्जीपणा आणि निकृष्ट कामांवर न्यायालयाने प्रशासनाला कडक सूचना देत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 25, 2026 | 02:21 PM
धक्कादायक! खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन हवेतच, मुदत संपल्यानंतर उच्च न्यायालयाच्या कडक सूचना (फोटो सौजन्य-ChatGPT)

धक्कादायक! खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन हवेतच, मुदत संपल्यानंतर उच्च न्यायालयाच्या कडक सूचना (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुदतही संपुष्टात
  • उच्च न्यायालयाकडून सूचना
  • बांधकामाच्या हलगर्जीपणाने खड्डे कायम
नाशिक: मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेत स्वतःहून जनहित याचिका दाखल करून मे २०१५ मध्ये महापालिकांना स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशांची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाने ९ जुलैला परिपत्रक जारी करत दोन आठवड्यात खड्डे बुजविण्याच्या सुचना दिल्या होत्या. आता ही मुदतही संपुष्टात आल्याने राज्य शासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, मनपाच्या बांधकाम विभागाकडून स्टार रेटसंदर्भातील घोटाळा उघडकीस आल्याने निम्मा पावसाळा जाऊनही रस्ते दुरूस्तीला मुहूर्त लागू शकलेला नाही.

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

रस्ता पूर्ववत करण्याची अट घालणे बंधनकारक

दोन आठवड्यात रस्ते दुरूस्स्ती न झाल्यास मनपा आयुक्तांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा शासनाने परिपत्रकाव्दारे दिला आहे. परिपत्रकानुसार राज्यातील सर्व महापालिकांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील रस्ते, पदपथ आणि पाण्याचा निचरा होण्यासाठीचे पाथहोल सुस्थितीत ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. रस्ते खोदकामाला परवानगी देताना संबंधित संस्था किवा कंपन्यांनी काम पूर्ण झाल्यावर रस्ता पूर्ववत करण्याची अट घालणे बंधनकारक करण्यात आली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात मात्र कोणत्याही अटीशती आणि नियमांचे पालन ना मनपा प्रशासनाकडून होत आहे ना ठेकेदारांकडून, यामुळे संपूर्ण शहर खोदून ठेवत त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

तक्रारींवर दोन आठवड्यात कार्यवाही

नागरिकांना रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीवर दोन आठवड्यांच्या आत अंतिम कार्यवाही पूर्ण करणे महापालिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यवाही पूर्ण झाल्यावर सुस्थितीत झालेल्या रस्त्यांची छायाचित्रे संकेतस्थळ तसेच स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करावी लागतील. याशिवाय, रस्ते दुरुस्तीसाठी वापरली जाणारी यंत्रणा आणि आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाची माहितीही जनतेसाठी खुली करावी लागेल असेही शासनाच्या परिपत्रकात म्हटले होते. तथापि, महापालिकेचे त्याकडेही दुर्लक्ष झाले.

न्यायालयाचा अवमान झाल्यास आयुक्तच जबाबदार

रस्त्याच्या कडेला काम करणा-या एजन्सीचे नाव, अंदाजित कालावधी आणि कामाची व्याप्ती दर्शवणारा फलक लावणे आवश्यक असल्याचे म्हटले असले तरी नाशिकमधील एकाही कामाच्या ठिकाणी अशा प्रकारचे फलक दिसून येत नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तत्काळ कार्यवाही करून केलेल्या कामाचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश सर्व महापालिकांना देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता संबंधित महापालिकेच्या आयुक्तांनी घ्यावी, अन्यथा अवमान झाल्यास आयुक्तांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Nashik Rain Update: मंदिरे पाण्याखाली, पंचवटीतील रामसेतू जलमय; मुसळधार पावसाचा नाशिकला फटका, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Web Title: Bombay high court pulls up authorities over pothole free roads deadline expired

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Nashik

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
1

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
3

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
4

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.