Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Nashik FDA Action: प्रशासनाने जप्त केलेल्या सर्व खाद्यपदार्थांचे कायदेशीर नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याच्या कठोर तरतुदींनुसार भेसळ करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 18, 2026 | 05:15 PM
FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
Follow Us
Follow Us:
  • नाशिक विभागात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची व्यापक विशेष तपासणी मोहीम
  • अवघ्या १० दिवसांत ३६ ठिकाणी छापे मारून ५.४० कोटींपेक्षा जास्त मूल्याचा माल जप्त
  • अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे व सहायक आयुक्त मंगेश माने यांच्या नेतृत्वात धडक कारवाई
Nashik FDA Seizes Suspected Food Items: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आगामी सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या समाजकंटकांवर आपली पकड घट्ट केली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नाशिक विभागात एक व्यापक विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. Nashik FDA Seizes Suspected Food Items Worth over 5 Crore

एफडीएचे १० दिवसांत ३६ ठिकाणी छापे

गेल्या १० दिवसांतच, विभागाच्या पथकांनी विभागातील विविध जिल्ह्यांमधील ३६ ठिकाणी छापे टाकले असून एकूण ५ कोटी ४० लाख १६ हजार ६२१ रुपयांचा संशयित आणि भेसळयुक्त माल जप्त केला आहे. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात पाश्चराइज्ड बटर, देशी तूप, क्रीम, खाद्यतेल, मिठाई, फळांचा गर आणि इतर दैनंदिन खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल

ही संपूर्ण कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे आणि सहायक आयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या थेट मार्गदर्शनाखाली केली जात आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, सुका मेवा आणि खाद्यतेलाच्या वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेणाऱ्या व्यापाऱ्यांना सोडले जाणार नाही.

द्वारका येथे खासगी बसेसमधून बर्फी जप्त

११ सप्टेंबरच्या पहाटे, नाशिक शहरातील वर्दळीच्या द्वारका चौकात दोन प्रवासी बसेस थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये २,१५५ किलो संशयास्पद बर्फी जप्त करण्यात आली. याव्यतिरिक्त, संडे, करंजा, पंचवटी पेठ रोड आणि जेल रोड येथील सुपरमार्केटमधून वनस्पती तेल, रिफाइंड सोयाबीन तेल, गूळ आणि तुपाचे संशयास्पद नमुने ताब्यात घेऊन साठा सील करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकांनी धुळे, जळगाव, पाचोरा, संगमनेर, श्रीरामपूर आणि सावेदी येथेही छापे टाकले.

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र

नमुने प्रयोगशाळेत पाठवले; दोषी आढळल्यास तुरुंगवास

प्रशासनाने जप्त केलेल्या सर्व खाद्यपदार्थांचे कायदेशीर नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याच्या कठोर तरतुदींनुसार भेसळ करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.

नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाची सुचना जारी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. कोठेही भेसळयुक्त अन्न तयार केले जात असल्याचा किंवा विकले जात असल्याचा संशय आल्यास, नागरिकांनी तात्काळ FDA च्या अधिकृत पोर्टल, https://complaints.mahafda.in वर तक्रार दाखल करावी, असे आवाहन केलं आहे.

Web Title: Nashik newsnashik fda seizes suspected food items worth 5 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • FDA Raid
  • Nashik
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
1

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’
2

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित
3

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.