Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yeola News: आखातातील युद्धाचा टरबुजालाही फटका! येवल्यात कवडीमोल भाव; उत्पादकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट

टरबूजाच्या निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने मागणीत सातत्याने घट होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 20, 2026 | 05:03 PM
आखातातील युद्धाचा टरबुजालाही फटका! येवल्यात कवडीमोल भाव; उत्पादकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट

आखातातील युद्धाचा टरबुजालाही फटका! येवल्यात कवडीमोल भाव; उत्पादकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट

Follow Us
Follow Us:

येवला : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. टरबूजाच्या निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने मागणीत सातत्याने घट होत आहे मागणी घटल्यामुळे टरबूजाचे चाजारभाव घसरले असून शेतकऱ्यांना कवडीमोल दरात माल विकण्याची वेळ आली आहे. परिणामी येवला तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर टरबूजाची लागवड केली होती. हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्‌या प्रमाणावर गुंतवणूक करून लागवड केली.

मधुमेह आणि लठ्ठपणावरील औषधे होणार स्वस्त! किमतीत ५० टक्क्यांहून अधिक घट, वाचा किती होणार फायदा?

टरबुजाला कमी भाव मिळत असून वाहतूक खर्चही निघत नसल्याची परिस्थिती

पाण्याची व्यवस्था, मजुरी, खत-औषधे, प्लास्टिक मल्चिंग आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च केला. हवामानही अनुकूल राहिल्याने उत्पादन चांगले झाले, मात्र बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या बाजारात टरबूजाची आवक प्रचंड वाढली असून टरबूजाला कमी भाव मिळत आहे. अनेक ठिकाणी टरबूजाला अत्यंत कमी भाव मिळत असून काही शांतक-यांना तर वाहतूक खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

उत्पादनखर्चही वसूल होत नाही

टरबूज उत्पादक शेतकरी सचिन वाल्हेकर यांनी म्हटले आहे की, गंदा टरबूजाचे उत्पादन चांगले झाले असले तरी बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला असताना आता मालाला योग्य भाव मिळत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतीतील गुंतवणूक परत मिळणेही कठीण झाले असून शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, टरबूजाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, निर्यातीचे पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावेत तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. सध्याच्या परिस्थितीत टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, शासनाच्या मदतीची त्यांना प्रतीक्षा लागली आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या- चांदीच्या दरातील घसरण सुरुच! नव्या किंमती पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना

 

Web Title: Even the watermelon got hit by the war of prices in yevalya prices are very low once again economic crisis for the producers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • farmer
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
3

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
4

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.