Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : इंधनटंचाईचा त्र्यंबकेश्वरच्या कामांवर परिणाम; मजूरांवरही उपासमारीची वेळ

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वरसह इतर जिल्ह्यात विकास कामांवर जोर दिला जात होता. पण इंधनाच्या तुटवड्यामुळे या सगळ्यावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 29, 2026 | 12:41 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इंधन टंचाईचा फटका त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हाभरातही
  • सर्व कामांच्या साईटवर शुकशुकाट
  • बहुतांश हॉटेलही बंद
Nashik News : जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जगासोबतच संपूर्ण देशभरात दिसून येत आहे. इंधन टंचाईचा फटका त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हाभरातही दिसून येतोय. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वरसह इतर जिल्ह्यात विकास कामांवर जोर दिला जात होता. पण इंधनाच्या तुटवड्यामुळे या सगळ्यावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. बुधवारी सायंकाळपासून पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या तर गुरुवारी पेट्रोलचा खडखडाट झाल्याने पंप बंद ठेवलेले आढळून आले. याचा फटका दुध भाजीपाला यांच्या पुरवठ्यावरही झालेला आहे. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा विकासकामे सुरू झाली आहेत. त्यावर आजूबाजूच्या परिसरातून दुचाकीने कारागिर व मजूर येत असतात.

LPG Crisis : गॅसतुटवड्यामुळे उद्योगांची चाके रुतली, सिलिंडर मिळत नसल्याने अनेक उद्योग बंद; हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

सर्व कामांच्या साईटवर शुकशुकाट

सायंकाळी घरी पतरणारा मजूर संभर पन्नास रूपयांचे पेट्रोल टाकत असतो; मात्र बुधवारी त्याला पेट्रोल मिळाले नाही आणि गुरूवार सकाळपासून झालेला खडखडाट यामुळे मजुरांना कामावर येणे शक्य झाले नाही. सिंहस्थ कुंभमेळयाच्या कामासोबत नागरिकांची खासगी बांधकामे सुरू आहेत. बांधकामाच्या सोबत वायरींग, प्लम्बिंग इत्यादी सर्व कामांच्या साईटवर शुकशुकाट दिसून आला.

आवश्यक तितकेच इंधन खरेदी करा

तहसील कार्यालयाने मात्र इंधन टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. पेट्रोल डिझेल आणि गॅस यांचा पुरवठा नियमीत होत आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊन एकाच वेळेस गर्दी केल्याने टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असे सांगितले आहे. साठेबाजी करणा-यावर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तितकेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बहुतांश हॉटेलही बंद

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाला उशीर झाला आहे. त्यात आता इंधन टंचाईने खोडा बसल्यास वेळेत काम पूर्ण होणे अशक्य होईल असे दिसून येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेऊन कृत्रिम असलेली इंधन टंचाई दूर करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनबारीवर जिल्हाभरातील इंधन टंचाईचा थेट परिणाम दिसून आला. गुरूवारी रामनवमी निमित्त शासकीय सुटी होती. इतर वेळेस शासकीय सुटीला दर्शनासाठी गर्दी उसळते मात्र गुरुवारी उत्तर दरवाजाला शुकशुकाट दिसून आला. त्र्यंबकेश्वर शहरात गॅस सिलेंडर टंचाईने बहुतांश हॉटेल बंद झाले आहेत. हातगाडे लावून चहापाणी नास्ता विकणारे बेरोजगार झाले आहेत.

Nashik News: “मंदिरात ऊर्जा नाही; रातोरात पाडून टाका…”, वैजेश्वर मंदिराबाबत कॅप्टन खरातचा अजब सल्ला

Web Title: Fuel shortage impacts work in trimbakeshwar laborers face starvation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Kumbh Mela 2027
  • Nashik
  • Oil Crisis

संबंधित बातम्या

Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव
1

Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
2

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News :युक्रेनच्या हल्ल्यांनी रशियाच्या तेल उद्योगाला मोठा धक्का; ५१% शुद्धीकरण क्षमता ठप्प
3

World News :युक्रेनच्या हल्ल्यांनी रशियाच्या तेल उद्योगाला मोठा धक्का; ५१% शुद्धीकरण क्षमता ठप्प

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
4

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.