Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Nashik News: पर्जन्यमानात तब्बल 23 टक्क्यांची घट झाल्याने पाच तालुक्यांतील भूजल पातळी खालावली आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप पिके करपली असून मोठे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 02, 2026 | 11:34 AM
धरण उशाला, तरी वाईचा शेतकरी तहानलेला; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

धरण उशाला, तरी वाईचा शेतकरी तहानलेला; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

Follow Us
Follow Us:
  • पाच तालुक्यांत भूजल पातळी घटली
  • खरीप करपला, आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
  • पाच तालुक्यांत भूजल पातळी खालावली
नाशिक : पावसात मोठा खंड पडल्याने खरीप हंगाम पूर्णतः करपला असून शेतकऱ्यांचा पदरात उत्पादन खर्चही पडणार नाही. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना आता सरकारडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरीपेक्षा कमी हजेरी लावल्याने जिल्हयावर टंचाईचे सावट ओढवले आहे.(Nashik News)

२३४.६७मीमी पावसाची तूट

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालात माहे जून ते सप्टेंबर २०२५ अखेर नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २३.९६ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०००.३२ मिमी असून यंदा सप्टेंबर अखेर केवळ ७६५.५५ मिमी पाऊस झाला आहे. २३४.६७ मिमी एवढी पावसाची तूट नोंदविली गेली असून तुटीचे प्रमाण २३.४६ टक्के इतके आहे. त्यामुळे पिकांवरच नाहीतर भूजल पातळीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत द्या’; प्रशासनाला शेतकऱ्यांची आर्त हाक

दोन ते तीन निरीक्षण विहिरी निश्चित

प्रत्येक पाणलोट क्षेत्रासाठी दोन ते तीन निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या असून सप्टेंबर अखेर या विहिरींमधील पाणीपातळीची नोंद घेण्यात आली. या नोंदीची तुलना सप्टेंबर महिन्यातील गेल्या पाच वर्षाच्या सरासरी स्थिर भूजलपातळीशी कारण्यात आली. येवला तालुक्यात ३ मीटरपेक्षा अधिक घट आढळून आली. तर चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नरमध्ये २ ते ३ मीटरपर्यंत पाणी पातळी खाली गेली आहे. तर नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये ० ते १ मीटरपर्यंत घट आहे. केवळ दिंडोरी आणि निफाडमध्येच पाणी पातळीत किचित वाढ दिसून आली आहे.

रब्बीही संकटात

नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमानातील तूट आणि भूजल पातळीमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे जलस्रोतांवरील ताण कमालीचा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे विहिरी, बोअरवेल आणि अन्य भूजलस्रोतांवर अवलंबून असणाऱ्या शेतक-यांसाठी ही स्थिती अत्यंत चिंताजनक ठरत आहे. विशेषत ज्या तालुक्यांमध्ये पावसाची २५ टक्क्यांपेक्षा अधिक तूट नौदवली गेली आहे, त्या भागातील खरीप पिकांच्या नुकसानीसोबतच आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याच्या उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

अहवालानुसार नाशिक आणि बागलाण तालुक्यांमध्ये १ ते १० टक्के पावसाची तूट झाली आहे. भूजलाचा उपसा वाढल्याने आणि पावसाने ओढ दिल्याने विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. यामुळे येत्या काळात शेतीसाठीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.

हत्येपूर्वी दोन हॉटेलमध्ये मुक्काम; सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह विविध कीवर्ड

Web Title: Groundwater level declines in 5 talukas kharif crops damaged rainfall sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप
1

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
2

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ
3

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ

Uran Fire News: उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग; मोठ्या स्फोटाने परिसर हादरला, धुराचे प्रचंड लोट!
4

Uran Fire News: उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग; मोठ्या स्फोटाने परिसर हादरला, धुराचे प्रचंड लोट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.