Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: लॉन्सचालकांनी शोधला डिझेल भट्टीचा पर्याय; मागणी वाढल्याने चारपटीने झाली दरवाढ

व्यावसायिक गॅस सिलींडरच्या तुटवड्यामुळे डिझेल भट्टीचे दरही चार पट वाढले आहेत. शिवाय युद्धामुळे भविष्यात डिझेलचे दर वाढले वा कमतरता भासली तर पुढे काय असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 14, 2026 | 02:49 PM
लॉन्सचालकांनी शोधला डिझेल भट्टीचा पर्याय; मागणी वाढल्याने चारपटीने झाली दरवाढ (फोटो सौजन्य-Gemini)

लॉन्सचालकांनी शोधला डिझेल भट्टीचा पर्याय; मागणी वाढल्याने चारपटीने झाली दरवाढ (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:
  • लॉन्सचालकांनी शोधला डिझेल भट्टीचा पर्याय
  • मागणी वाढल्याने चारपटीने झाली दरवाढ
  • लग्न समारंभात केटरर्सची मोठी अडचण
नाशिक : व्यावसायिक गॅस सिलींडरच्या तुटवड्यामुळे समारंभाच्या तयारीत असलेल्या लॉन्स व मंगल कार्यालय चालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला असून, दोन, तीन महिन्यांपुर्वी आगाऊ बुकौंग केलेल्या समारंभ पुर्णत्वास कसा न्यावा अशा विवंचनेत ते सापडले आहेत. त्यातूनच लाकडी भट्टचा, डिझेल भट्टीचा पर्याय पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बाजारातील मागणी लक्षात घेता डिझेल भट्टीचे दरही चार पट वाढले आहेत. शिवाय युद्धामुळे भविष्यात डिझेलचे दर वाढले वा कमतरता भासली तर पुढे काय असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.

शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्ग, पंचवटी, नाशिकरोड, सिडको, त्र्यंबकेश्वर रोड, गंगापुररोड या शहरालगतच्या भागात सुमारे ४०० हून अधिक लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. वाहनांसाठी पुरेशी जागा व दळणवळणासाठी सोयीस्कर ठिकाणे म्हणून लग्न समारंभासाठी येथील लॉन्सला पसंती आहे. तीन ते चार महिने अगोदरच बुकींग झाले आहे. बहुतांशी लॉन्स चालकांचेच केटर्स संलग्न असल्यामुळे लग्नाचे पॅकेज जेवणासह घेण्याकडे कल आहे. अशा परिस्थितीत आता त्यांच्यापुढे व्यावसायिक सिलींडरचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. लग्न समारंभाच्या तारखा अगोदरच निश्चित झाल्याने वधु-वर मंडळींकडून त्याची तयारी केली जात असली तरी, आता त्यात बदल करण्याची वेळ येवून ठेपल्याचे नारायण सांगळे यांनी सांगितले. मात्र काही लग्न समारंभ पुढे ढकलण्यास दोन्ही बाजूंकडील मंडळी तयार नसल्याने गॅस टंचाईवर कशी मात करावी अशी विवंचना आहे. त्यावर पर्याय शोधला जात असल्याचे सांगळे यांनी सांगितले.

LPG Gas Shortage: हातगाड्यापासून पंचतारांकितला ‘गॅस ‘ची झळ; वडापाव, मिसळसाठी जादा दर, हॉटेलमधील जेवणाला पूर्णविराम

डिझेल भट्टीची किंमत झाली ४५ ते ६० हजारापर्यंत

व्यावसायिक गॅस सिलींडर सुरळीत मिळेपर्यंत केटर्सचा मोर्चा आता डिझेल भट्टीकडे वळाला आहे. पूर्वी १२ ते १४ हजाराला मिळणाऱ्या डिझेल भट्टीचा दर आता ४५ ते ६० हजारापर्यंत पोहोचला आहे. इंदौर अथवा पुण्याहून त्या मागवाव्या लागतात. ऑर्डर दिल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी त्या मिळतात, असे केटर्सचे म्हणणे आहे. डिझेल भट्टी घेतल्याने काही प्रश्न सुटणार असले तरी, आखातातील युद्धामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली तर पुढे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

साठा आहे तोवर बुकींग पूर्ण करण्यावर भर

केटर्सचा व्यवसाय करणाऱ्या काहींनी अगोदरच सिलीडरची व्यवस्था करून ठेवली आहे. दोन किंवा तीन टाक्यामध्ये एक लग्न समारंभपार पडतो. त्यामुळे हातात आहे तेवढ्या सुपारी पूर्ण करून घेण्यावर भर देण्यात आला असल्याचे निलेश पैखळे यांनी सांगितले. स्टॉक आहे तो पर्यंत ठीक आहे. त्यानंतर अन्य पर्याय शोधावे लागतील, पुढे सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे लग्न समारंभहोणार नाही. त्यामुळे सध्याचा हंगाम हातचा जावू द्यायचा नाही असेही पेखळे यांनी सांगितले.

दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही, केटरर्सने काढले पत्रक

गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या झळा आता थेट सर्वसामान्य नागरिकांच्या खिशापर्यंत पोहोचल्या आहेत. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लग्नाची तयारी अनेक कुटुंबांनी केलेली आहे. यासाठी आप्तेष्टांना सुग्रास भोजन मिळावे, यासाठी चांगल्या केटरर्सची निवड करून ठेवली, मात्र आता ऐन वेळी सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठाही थांबवण्यात आला आहे. त्यामुळे इतर मागाँनी केटरर्स आपला व्यवसाय पुढे नेत आहेत. यात जादा पैसे देऊन सिलिंडरची उपलब्धता करणे अथवा स्वयंपाकासाठी इतर मार्गाचा वापर करून लग्नकार्य पार पाडावे लागत आहे. त्यामुळे आपसूकच खर्च वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आमच्या अडचणी समजून घेऊन वाढीव दर द्यावेत, असे आवाहन करणारे पत्रकच केटरिंग असोसिएन, नाशिक यांनी काढले आहे.

नाईलाजास्तव काहींनी लग्नाच्या तारखा बदलल्या

मे महिन्याच्या अखेरपर्यंत लग्न समारंभाच्या तारखा असल्याने आगामी अडीच महिने लॉन्स व केटर्स चालकांसाठी पर्वणी असली तरी, सध्याची परिस्थिती पाहता त्यांचा व्यवसायही धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. सिलींडर जवळ जवळ मिळत नसल्याने काही लॉन्स चालकांनी वधू-वराकडील मंडळींना विनंती करून तारखा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. काहींनी परिस्थिती पाहून तारखा पुढे ढकलल्या. तर काहींनी जेवणाच्या पदार्थांमध्ये कपात करून का होईना लग्न समारंभ पार पाडण्याची तयारी दर्शविली आहे.

५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव; जळगावमध्ये अपघाताची बनावट स्क्रिप्ट, डॉक्टरांसह ९ जण अटकेत

Web Title: Loan drivers found an alternative to the diesel stove due to increased demand the price has quadrupled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • india
  • Nashik
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Strait Of Hormuz : इराण होर्मुझवरुन जाणाऱ्या जहाजाकडून १८ कोटी रुपये वसूल करतोय? सोशल मीडियावरील ‘त्या’ दाव्याचे सत्य आले समोर
1

Strait Of Hormuz : इराण होर्मुझवरुन जाणाऱ्या जहाजाकडून १८ कोटी रुपये वसूल करतोय? सोशल मीडियावरील ‘त्या’ दाव्याचे सत्य आले समोर

Middle East War : इराणचा ‘रक्षक’ आता अमेरिकेच्या रडारवर? सर्गियो यांची श्रीलंकेला भेट, हिंद महासागरात युद्ध पेटणार?
2

Middle East War : इराणचा ‘रक्षक’ आता अमेरिकेच्या रडारवर? सर्गियो यांची श्रीलंकेला भेट, हिंद महासागरात युद्ध पेटणार?

LPG Gas Shortage: ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली; गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल, रोजगाराचा प्रश्न
3

LPG Gas Shortage: ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली; गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल, रोजगाराचा प्रश्न

India First : सरकार संवेदनशील, सतर्क आणि मदतीसाठी सज्ज, 3.75 लाख भारतीय परतले; PM Modiनी लोकसभेत मांडली रणनीती
4

India First : सरकार संवेदनशील, सतर्क आणि मदतीसाठी सज्ज, 3.75 लाख भारतीय परतले; PM Modiनी लोकसभेत मांडली रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.