Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Shortage: ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली; गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल, रोजगाराचा प्रश्न

इंधनाअभावी तालुक्यातील अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली असून, सुरू असलेल्या हॉटेल्सनी आपल्या खाद्यपदार्थांच्या यादीत (मेनू) मोठी कपात केली आहे. यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 23, 2026 | 02:55 PM
ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली; गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल, रोजगाराचा प्रश्न

ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली; गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल, रोजगाराचा प्रश्न

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली
  • गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल
  • रोजगाराचा प्रश्न
इगतपुरी : आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा   थेट परिणाम इगतपुरीतील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायावर झाला आहे. इंधनाअभावी तालुक्यातील अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली असून, सुरू असलेल्या हॉटेल्सनी आपल्या खाद्यपदार्थांच्या यादीत (मेनू) मोठी कपात केली आहे. यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून हॉटेल चालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या इगतपुरीतील मुंबई-आग्रा महामार्गावरील मानस लाइफस्टाइल रिसॉर्ट, नर्मदा हॉटेल, साई प्लाझा, फूड प्लाझा यांसारख्या मोठ्‌या आणि नामवंत हॉटेल्समध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे.

गॅस उपलब्ध नसल्याने दररोज तयार होणारे सुमारे २०० पदार्थांचे मेनू आता केवळ ५० ते ६० पदार्थावर आले आहेत. विशेषतः साठच इंडियन आणि चायनीज पदार्थ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

Dialysis रुग्णांची धावपळ थांबणार कधी? केंद्र-राज्याच्या आरोग्य योजनेचा गुंता

खर्चात वाढ, उत्पन्नात घट

गॅस टंचाईचा फायदा घेत लाकूड आणि कोळसा विक्रेत्यांनी दर वाढवले आहेत. पूर्वी ८० ते ८५ रुपये किलो असलेला कोळसा आता १०० ते १०५ रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन खर्च वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कर्मचाऱ्यांच्या जेवणातही कपात करून साध्या पद्धतीचे जेवण दिले जात आहे.

पर्यटनाचे आर्थिक गणित धोक्यात

इगतपुरी तालुका पर्यटनावर अवलंबून असल्याने या संकटामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला खिळ बसण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पूर्वी केवळ ‘चुलीवरचे मटण’ हौसेने खाल्ले जायचे, मात्र आता चहापासून सर्वच खाद्यपदार्थ नाईलाजास्तव चुलीवर करावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

चूल आणि कोळशाचा वापर वाढला

गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हटिल व्यावसायिकांनी आता पारंपरिक पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे. अनेक ठिकाणी चपाती बंद करून चुलीवरची भाकरी आणि रोट्या देण्यास सुरुवात झाली आहे. जास्त वेळ आणि इंधन लागणारे ‘नॉन-व्हेज’ पदार्थ (विशेषतः मटण) मेनूतून वगळण्यात आले आहेत. काही पदार्थ तयार करण्यासाठी इंडक्शन शेगडीचा वापर वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, मध्य पूर्वेतील संकट, देशांतर्गत साठा कमी झाल्यामुळे आणि आयातीत घट झाल्यामुळे, सरकारी तेल कंपन्या मर्यादित एलपीजीची बचत करण्याची तयारी करत आहेत. या कंपन्या आता १४.२ किलोग्रॅमच्या सिलिंडरमधून घरांना केवळ १० किलोग्रॅम एलपीजी पुरवठा करण्याची योजना आखत आहेत. हा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. शक्य तितक्या जास्त घरांना एलपीजीचा पुरवठा कायम ठेवत त्याची बचत करणे, हा यामागील उद्देश असल्याचे मानले जाते.

Nashik News : रिक्षाचालकांचा चालंलाय मनमानी कारभार, प्रवाशांची सुरु आहे आर्थिक लूट

Web Title: Stoves ignited in rural hotels business owners struggle due to lack of gas news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • LPG Shortage
  • Nashik

संबंधित बातम्या

NEET पेपरफुटीचा ‘नाशिक’ पॅटर्न उघड! हरियाणा ते बिहार पसरले धागेदोरे; नाशिकमधून ३० वर्षीय संशयिताला अटक
1

NEET पेपरफुटीचा ‘नाशिक’ पॅटर्न उघड! हरियाणा ते बिहार पसरले धागेदोरे; नाशिकमधून ३० वर्षीय संशयिताला अटक

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…
2

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…

Nashik Crime: हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; लग्नासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, काय घडलं नेमकं?
3

Nashik Crime: हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; लग्नासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, काय घडलं नेमकं?

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल
4

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.