Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमध्ये सुरू झाले पहिले ‘धान्य एटीएम’! अंगठा लावताच ३५ सेकंदांत मिळणार २५ किलो धान्य

रेशनचे धान्य घेण्यासाठी दुकानांसमोर तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज लवकरच कमी होऊ शकते. महाराष्ट्रात सुरू होत असलेल्या ‘धान्य एटीएम’ सुविधेमुळे रेशन वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2026 | 10:57 AM
नाशिकमध्ये सुरू झाले पहिले ‘धान्य एटीएम’! अंगठा लावताच ३५ सेकंदांत मिळणार २५ किलो धान्य

नाशिकमध्ये सुरू झाले पहिले ‘धान्य एटीएम’! अंगठा लावताच ३५ सेकंदांत मिळणार २५ किलो धान्य

Follow Us
Follow Us:
  • नाशिकनंतर ठाणे आणि नागपूरमध्येही ‘धान्य एटीएम’ सुविधा सुरू करण्याची घोषणा.
  • बायोमेट्रिक पडताळणी आणि स्वयंचलित यंत्रणेमुळे धान्य वितरण अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न.
  • ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेमुळे स्थलांतरित कामगारांनाही देशातील विविध ठिकाणी रेशनचा लाभ घेता येतो.
राज्यातील गोरगरीब, कष्टकरी आणि कामगारांना रेशनचे धान्य मिळवण्यासाठी कामावरून सुट्टी काढून दुकानांसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. आता लाभार्थी दिवसभरात किंवा रात्री कधीही जाऊन थेट स्वयंचलित मशिनद्वारे धान्य घेऊ शकतील. कोका-कोला किंवा चॉकलेटच्या वेंडिंग मशिनप्रमाणे येथे पैसे टाकण्याची गरज नाही; लाभार्थ्याने ओळख पडताळणीसाठी क्रमांक टाकून अंगठा लावला की अवघ्या ३५ सेकंदांत तब्बल २५ किलो धान्य थेट पोत्यात पडेल. ‘धान्य एटीएम’ सारखी ही २४ तास चालणारी आधुनिक प्रणाली राज्यात सुरू करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. नाशिकनंतर ही सुविधा ठाणे, नागपूर येथे सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले, पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील नव्या सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गोदामांमधील काळाबाजार रोखण्यासाठी आखलेली नवी प्रणाली याबाबत सविस्तर माहिती दिली. रेशन दुकान बंद होण्याची किंवा दुकानदाराची वाट पाहण्याची गरज आता उरलेली नाही, असे ते म्हणाले.

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

बायोमेट्रिक सुरक्षितता

ही प्रणाली बायोमेट्रिक पडताळणी आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने कोणाचाही हक्क मारला जाणार नाही अथवा धान्याची चोरी होणार नाही. या उपक्रमाला जागतिक अन्न कार्यक्रमाचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. धान्य वाहतूक आणि वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना ते म्हणाले, पूर्वी प्रमुख गोदामातून धान्य उचलून दुसऱ्या गोदामात आणायचे, पोते उसवायचे, धान्य खाली करायचे, पुन्हा नव्या गोणीत भरायचे आणि मग ट्रकमध्ये टाकून दुकानात पाठवायचे. या सगळ्या उपद्व्‌यापात प्रचंड धान्य गळती आणि गैरप्रकार व्हायचे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नव्या कार्यक्रमानुसार हा प्रकार आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

हायटेक कार्यक्षमता

या स्वयंचलित मशिनमध्ये एका वेळी तब्बल २,५०० किलोग्रॅम म्हणजेच २५ क्विंटल धान्य साठवून ठेवण्याची प्रचंड क्षमता आहे. सुरुवातीला समजून घेण्यासाठी लाभाथ्यांना अर्धा ते १ मिनिट लागेल; मात्र एकदा सवय झाल्यावर अवघ्या ३५ सेकंदात २५ किलो धान्य अचूक वजनासह वितरीत होईल. यामुळे ‘मापात पाप’ किवा धान्य गळतीचा प्रश्नच उद्भवणार नाही.

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

‘वन नेशन वन कार्ड’चा परप्रांतीयांनाही लाभ

स्थलांतरित कामगार आणि इतर राज्यातील नागरिकांसाठी असलेल्या सुविधेवर भाध्य करताना त्यांनी स्पष्ट केले, केंद्र सरकारच्या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा सर्वाधिक लाभमहाराष्ट्रात घेतला जात आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार किंवा देशातील कोणत्याही भागातून आलेला मजूर मुंबई, नाशिक किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्या मूळ रेशन कार्डवर मोफत धान्य मिळवू शकतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नागरिक चेन्नई किंवा बंगळुरूला गेला तरी त्याला तेथे धान्य मिळेल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Maharashtra grain atm nashik thane nagpur 25 kg ration grain in 35 seconds nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Marathi News
  • Nashik News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: परदेशी भाषा शिकून करिअर घडवायचंय? प्रियंका सैतवडेकरने दिला यशाचा मंत्र
1

Exclusive Navarashtra-Navadurga: परदेशी भाषा शिकून करिअर घडवायचंय? प्रियंका सैतवडेकरने दिला यशाचा मंत्र

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले
2

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध
3

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ
4

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.