Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीत महाविकासचे पत्ते उघड; महायुतीच्या उमेदवाराविरोधात एकजूट करण्याची तयारी

विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार हाच विरोधी उमेदवार असेल, असे संकेत देत महाविकास आघाडीने राजकीय हालचालींना वेग दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2026 | 11:15 AM
विधान परिषद निवडणुकीत महाविकासचे पत्ते उघड; महायुतीच्या उमेदवाराविरोधात एकजूट करण्याची तयारी

विधान परिषद निवडणुकीत महाविकासचे पत्ते उघड; महायुतीच्या उमेदवाराविरोधात एकजूट करण्याची तयारी

Follow Us
Follow Us:
  • आमचा विरोध महायुती उमेदवाराला
  • महाविकास आघाडीचा दावा
  • पडद्याआडून हालचालींना वेग
नाशिक : पाठीशी संख्याबळ मोठे असतांनाही अंतर्गत नाराजी व दगाफटक्याच्या भितीने महायुतीकडून सावध पावले टाकली जात असतांना निवडणूकीच्या दोन दिवस अगोदर महाविकासने आपले पत्ते उघड केले आहेत. महायुतीचा अधिकृत उमेदवार हा आमचा विरोधी उमेदवार असेल असे सांगून रात्रीपर्यंत महाविकासची भूमिका मुंबईतून निश्चित होईल असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. महाविकाच्या या अधिकृत भूमिकेवरून विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी पडद्याआड काहीतरी हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, काहींनी प्रतिनिधींमार्फत तर काहींनी मध्यस्थांमार्फत संपर्क साधल्याचा दावाही महाविकासच्या नेत्यांनी केला आहे.

Maharashtra politics : नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपाचा व्हीप जारी; ५२ नगरसेवक सहलीसाठी रवाना

विधान परिषदेच्या स्थानिक संस्था निवडणूकीसाठी मतदानाला अवघे दोन शिल्लक असून, जागा वाटप व उमेदवार निवडीवरून महायुतीत गेली आठ दिवस सुरू असलेल्या महाभारतावर तुर्त पडदा पडलेला दिसत आहे. त्यातून शिंदे सेना व भाजपाचे मतदार एका पाठोपाठ सहलीवर रवाना झाले तर राष्ट्रवादीचीही नाराजी काढून ते देखील कळपात सामील झाले आहेत. महायुतीची ही धडपड दगाफटका रोखण्यासाठी असली तरी, गेल्या आठ दिवसांपासून महायुतीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या महाविकास आघाडीने अखेरच्या टप्प्यात निवडणूकीत रंग भरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

येवला, मनमाड, नांदगावचे नगरसेवक सहलीला

गिते यांच्या माघारीनंतर सर्व सुरळीत असल्याचे चित्र असले तरी कोणताही चोका पत्करायचा नाही, या भूमिकेतून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महत्वाची रणनीती आखली आहे. येवला, मनमाड आणि नांदगाव परिसरातील नगरसेवकांची मुंबई येथे सहल आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून संबंधित नगरसेवकांना निवडणुकीपर्यंत एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे मुंबईला रवाना करण्यात आलेल्या नगरसेवकांना मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर आणण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नगरसेवकांचे मतदान निर्णायक ठरत असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात आहे. बंडखोरीची चर्चा ओसरली असली तरी महायुतीकडून सावधगिरीची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. नगरसेवकाना मुंबईत हलवण्याच्या निर्णयामुळे राजकीय चर्वांना उधाण आले आहे. नगरसेवकांना मुंबईत हलवण्याच्या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

काहींनी संपर्क केल्याचा गौप्यस्फोट

ठाकरे सेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी, विधान परिषद निवडणूकीत महाविकासची भूमिका महत्वाची राहणार असल्याचे सांगून, महायुतीच्या विरोधातील उमेदवाराला महाविकासचे समर्थन असेल असा दावा करून निवडणूकीत चुरस वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. आज, उद्यापर्यंत महाविकास आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगतांनाच या निवडणूकीबाबत काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी अप्रत्यक्ष संपर्क केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्याच बरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश खखैरे यांनीही महाविकासची भूमिका महायुतीच्या विरोधातील स्पष्ट असल्याचे सांगितले. काहींनी आपली भेट घेवून पाठिंब्यासाठी गळ घातल्याचे ते म्हणाले. या संदर्भात आजच कॉंग्रेसचे महापालिकेचे गटनेते सुफी जीन यांच्याशी चर्चा झाली असून, मतदानाच्या काही तास अगोदरही पक्ष भूमिका जाहीर होऊ शकते असे सांगितले.

तीन उमेदवारांमुळे महाविकासला महत्व

विधान परिषदेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीने अधिकृत नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देवून समर्थक गोकूळ गिते, प्रसाद हिरे यांना माघारीसाठी भाग पाडले तरी, मतपत्रिकेवर तीन उमेदवारांची नावे आहेत. महाविकासकडून दराडे यांना पाठबळ मिळाणार नसला तरी, उर्वरित दोन उमेदवार रिंगणात असल्याने त्यापैकी एकाच्या पारड्यात मतांचे बळ पडू शकते.

नाशिकच्या जागेवर महायुतीची मोठी रणनीती! बच्चू कडूंच्या आंदोलनावर आणि उद्धव ठाकरेंच्या ‘ऑनलाईन’ उपस्थितीवर उदय सामंत कडाडले

Web Title: Mahavikas aghadi final strategy before vidhan parishad election mahayuti challenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • BJP
  • Election
  • MVA
  • Nashik
  • Nationalist Congress Party
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
2

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
3

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.