Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिन्नरला माणिकराव कोकाटेच ठरले बाजीगर! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सभा ठरल्या निष्प्रभ; भाजपाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर

 माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती.याचदरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या गटाकडे देत सिन्नरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ नगरसेवक निवडून दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 24, 2025 | 12:22 PM
सिन्नरला माणिकराव कोकाटेच ठरले बाजीगर

सिन्नरला माणिकराव कोकाटेच ठरले बाजीगर

Follow Us
Close
Follow Us:
  • माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांना समसमान कौल
  • एकहाती सत्ता कुणालाही न देता नगरपालिकेतील सत्तासंतुलन
  • उबाठा गटाचे १४ नगरसेवक विजयी केले.
भरत घोटेकर, सिन्नर: राज्यात महायुती सरकार सत्तेत असतानाही सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा आणि शिंदेसेना यांनी स्वतंत्र चूल मांडली. या पार्श्वभूमीवर सिन्नरकरांनी सुज्ञ आणि संतुलित मतदान करत माजी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांना समसमान कौल दिला. एकहाती सत्ता कुणालाही न देता नगरपालिकेतील सत्तासंतुलन राखण्याचा स्पष्ट संदेश मतदारांनी दिला.

नगराध्यक्षपदाची सूत्रे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गटाकडे देत सिन्नरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे १३ नगरसेवक निवडून दिले. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग करत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा गटाचे १४ नगरसेवक विजयी केले. त्यामुळे नगरपालिकेतील कामकाजासाठी कोकाटे आणि वाजे या दोन्ही नेत्यांना समसमान संधी मिळाली आहे. मात्र अध्यक्षपदी आमदार कोकाटे समर्थक विठ्ठल उगले यांची वर्णी लागल्याने सत्ता परिवर्तन करत कोकाटेच बाजीगर ठरले आहेत.

 “हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठ्यांना लागलेला श्राप…; संजय राऊत म्हणाले काय?

कोकाटे वाजे यांच्यासह भाजपाचे २ आणि शिंदेसेनेचा १ नगरसेवक निवडून आल्याने दोन्ही पक्षांनी नगरपरिषदेत मर्यादित स्वरूपात प्रवेश मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभांना मतदारांनी फारसा प्रतिसाद न दिल्याचे निकालातून दिसले. पक्षाऐवजी व्यक्तीनिष्ठ राजकारणाला सिन्नरकर प्राधान्य देतात, हे या निवडणुकीतही प्रकर्षाने दिसून आले.

माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नगराध्यक्षपदासाठी सालस व सर्वमान्य चेहरा म्हणून विठ्ठलराजे उगले यांना पुढे केल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. याशिवाय मराठा मतांचा वाढता टक्का आणि कोकाटे यांची विकासाची साद त्यांना विजयाकडे घेवून गेली.

उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची जबाबदारी कोकाटे यांच्यावर असल्याने त्यांना सिन्नरमध्ये मर्यादित वेळ देता आला. मात्र त्यांची कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी शहरात ठाण मांडत घराघरांत प्रचार केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. खासदार राजाभाऊ वाजे यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. अंतिम टप्यात खासदार वाजे, ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे तसेच दीप्तीताई वाजे यांनी प्रचारात लक्ष घातल्याने उबाठा गटाचे १४ नगरसेवक निवडून आले, प्रभाग क्रमांक ११ मधील दोन, प्रभाग ७ मधील दोन आणि प्रभाग २ मधील एक जागा राष्ट्रवादीकडून खेचून घेण्यात वाजे गट यशस्वी ठरला. मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी करण्यात त्यांना अपयश आले.

दरम्यान, प्रभाग क्रमांक १, २, ४, ५, ६, ८, १२ व १३ या आठ प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाले. सुज्ञ मतदारांनी जाणीवपूर्वक मतदान केल्याने अनेक दिग्गजांना फटका बसला. प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादीच्या वंदना गोजरे अवध्या एका मताने पराभूत झाल्या. विशेष म्हणजे या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठल उगले आणि नगरसेवक पदाचे उमेदवार बाळासाहेब उगले यांना मात्र भरघोस मते मिळाल्याचे चित्र दिसून आले.

तेल गेले तूपही गेले…

राष्ट्रवादी काँग्रेस कडून अध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित झाली असतानाही ४ नंबरच्या प्रभागातून पुतण्या शुभम यालाही उमेदवारी मिळावी यासाठी नामदेव लोंढे आग्रही होते. मात्र सागर भाटजिरे या तरुणाला उमेदवारी देण्यासाठी कोकाटे यांनी लोंढे यांचे पुतण्या प्रेम झिडकारले, त्यातूनच कोकाटे यांना सोडचिठ्ठी देत नामदेव लोंढे रातोरात शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिन्नरमध्ये सभा होऊनही नामदेव लौटे याना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. पक्षाची संघटनात्मक ताकद कमी असल्याने त्यांना अपेक्षित यश मिळाले नाहीं. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी ते स्वतः तर प्रभागातून पुतण्या पराभूत झाला. त्यामुळे त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर लोडे घराण्याचा एकही सदस्य नगरपालिकेत दिसणार नाही. त्यामुळे त्यांची अवस्था तेल गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले अशी झाली आहे.

Maharashtra Politics : भाजपा पुन्हा देणार धक्का! काँग्रेससह मनसेचे दिग्गज नेते भाजपाच्या वाटेवर

भाजपाचे सत्तेचे मनसुबे उधळले

भाजपाचे उदय सांगळे यानी प्रयत्नांची शिकस्त केली तरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत वाजे चौथ्या क्रमांकावर राहिले, मात्र प्रभाग क्रमांक १० मधून आशा कर्पे आणि अनिल सरवार या दीन जागा भाजपाला मिळाल्याने तोच दिलासा ठरला, प्रमोद चोथवे यांच्याशिवाय वाजे घराण्याचा अन्य कुठलाही उमेदवार नाही, असे ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यानी पहिल्याच प्रचार सभेत ठासून सांगितल्याने हेमत वाजेंना त्याचा फटका बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांनी सिन्नरवर लक्ष केंद्रित करूनही त्याचा सकारात्मक परिणाम दिसला नाही. परिणामी नगराध्यक्ष पदाला गवसणी घालण्याचे हेमंत वाजे यांचे मनसुबे फोल ठरले.

Web Title: Manikrao kokate emerged as the winner in sinnar chief minister deputy chief minister meetings proved ineffective

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Manikrao Kokate
  • Nashik
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

‘दादां’च्या भुमिकेमुळे मविआला बळ? मनोमिलनाच्या शक्यतेने वाढली रंगत
1

‘दादां’च्या भुमिकेमुळे मविआला बळ? मनोमिलनाच्या शक्यतेने वाढली रंगत

Farmers News: …म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट, नादुरुस्त कालव्यामुळे रब्बी पेरणी लांबली
2

Farmers News: …म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट, नादुरुस्त कालव्यामुळे रब्बी पेरणी लांबली

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा
3

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Namokar Tirth : णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटींच्या आराखड्याला मान्यता, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
4

Namokar Tirth : णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटींच्या आराखड्याला मान्यता, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.