पुणे म्हाडा (फोटो- सोशल मिडिया)
या गृहनिर्माण योजनेसाठी २४ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
मात्र, अर्जदारांनी ऑनलाईन अपलोड केलेले अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल) आणि उत्पन्नाचा दाखला यांची ‘MahaIT’ कडून, तसेच आयकराच्या विवरणपत्राची (Income Tax Return) ‘Income Tax’ विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने पडताळणी केली जाते. या पडताळणी प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे अर्जदारांना फॉर्म भरताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
ऑनलाईन पडताळणीत होणाऱ्या विलंबाबाबत अर्जदारांकडून मुदतवाढ मिळण्यासाठी सातत्याने विनंती केली जात होती. अर्जदारांची ही अडचण आणि मागणी विचारात घेऊन प्रशासनाने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वाढीव मुदत: १५ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
इच्छुक अर्जदारांनी या मुदतवाढीची नोंद घेऊन मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






