Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai-Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात अपघातांचे सत्र; प्रशासनाकडून पाहणी

Mumbai-Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील (NH-3) चांदवड तालुक्यातील राहुड घाटात तीव्र उतार आणि धोकादायक वळणांमुळे वारंवार अपघात होत आहेत. या अपघातांना आळा घालण्यासाठी स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही कॅमेरे, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक आणि सुरक्षा कठडे बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 04, 2026 | 06:22 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • अपघाताचा घाट  
  • वाहनांवर कडक नियंत्रण ठेवणे गरजेचे   
  • अपघाताचे प्रमाण हे हॅवी ट्रक्स मुळे 
 

Mumbai-Agra Highway : मुंबई- आग्रा महामार्गावर ( NH-3) चांदवड तालुक्यातील राहुड घाटात अपघाताचे  सत्र सुरूच आहे. राहुड घाट हा तीव्र उतार आणि वळणांमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात त्यामुळे या घाटात ‘मृत्यूचा सापळा’ ठरणारा घाट म्हणून ओळखला जात आहे.

या अपघातांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. उमराणे प्रेस क्लब आणि नागरिकांच्या वतीने चांदवड टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. तसेच रस्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन

अपघाताचा घाट

राहुड घाट हा अपघातांचा धोकादायक घाट बनला आहे. या घाटात वारंवार अपघात होत असतात; या घाटात  होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांनी आपला जीव गमवलेला आहे. अपघातांची ही मालिका थांबवण्याची गरज आहे.  थांबण्याचे नाव घेत नाही. या मुळे नागरिकांमध्ये आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वाहनांवर कडक नियंत्रण ठेवणे गरजेचे

राहुड घाटात ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही कॅमेरे, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक आणि सुरक्षा कठडे बांधण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच घाटातून अवघड परिस्थितीत प्रवास करणाऱ्या वाहनांवर कडक नियंत्रण ठेवावे व रस्त्याची तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी सुरक्षा आराखडा तयार करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

अपघाताचे प्रमाण हे हॅवी ट्रक्स मुळे

चांदवड टोल व्यवस्थापक आणि पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी राहुड घाटाची पाहणी केली. पाहणीदरम्यान घाटातील कोणत्या ठिकाणी अपघाताचा धोका अधिक आहे, कोणत्या भागात वाहनांचा वेग नियंत्रित करण्याची गरज आहे, तसेच अपघात झाल्यास तातडीने मदत कशी उपलब्ध करून देता येईल याबाबत पाहणी केली

जे मेजर घ्यायचे आहे; ते आपण घेतले आहे. काही ठिकाणी आपण बोर्ड वाढवणार आहोत. स्पिड बेकर्सची हाईट काही ठिकाणी कमी झाली आहे. ती आपण पूर्ण करणार आहोत. त्याच बरोबर राहुड घाटा मध्ये जास्त अपघाताचे प्रमाण हे हॅवी ट्रक्स आहेत. यावर आपण कॅपेन करणार आहोत असे चांदवड टोल व्यवस्थापकांनी म्हटले आहे.

तहसीलदार अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली, आणि अपघाताचे प्रमाण कसे कमी करता येतील यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. या मध्ये स्थानिकांनी दिलेल्या सुचनेचा विचार करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी सांगितले आहे.

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

Web Title: Mumbai agra highway rahud ghat accident safety measures sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • highway news
  • mumbai nashik highway
  • nashik accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.