Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्… नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!

Nashik Crime News: इंदूर महामार्गावर येवल्याजवळ झालेल्या भीषण अपघाताने उडाली खळबळ! भरधाव बसने दुचाकीला उडवल्याने अल्पवयीन मुलासह तिघे जण रस्त्यावर फेकले गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना पाहून स्थानिकांची उडाली तारांबळ!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 05, 2026 | 09:34 AM
Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्... नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!

Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्... नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!

Follow Us
Follow Us:
  • नाशिकच्या वाइन शॉपमध्ये प्रेसर गनच्या खिळ्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू
  • ग्राहकाने प्रेसर गनने संशयास्पद कृती केल्याने घातपाताचा संशय
  • अंबड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू
Nashik Crime News: नाशिक शहरातील सिडको परिसरातील एका वाइन शॉपमध्ये घडलेल्या अतिशय धक्कादायक आणि गंभीर घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. कामावर असताना प्लायवूड ठोकण्याच्या प्रेसर गनचा लोखंडी खिळा थेट छातीत शिरल्याने ३९ वर्षीय कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सुनील अनिल तायडे (वय ३९, रा. इन्कम टॅक्स कॉलनी, अंबड लिंकरोड, नाशिक) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी, आता या घटनेचे अत्यंत संशयास्पद सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आल्याने ही घटना केवळ अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: Indore Highway Accident: इंदूर महामार्गावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती! भरधाव बसने दुचाकीला उडवले, अल्पवयीन मुलासह तिघे गंभीर!

नेमका प्रकार कसा घडला?

सोमवारी (२ नोव्हेंबर) रात्री ७ वाजताच्या सुमारास सुनील तायडे हे सिडकोतील स्टेट बँक चौक परिसरातील ‘लिकर कट्टा’ या वाइन शॉपमध्ये नेहमीप्रमाणे कामावर उपस्थित होते. त्याच वेळी अचानक प्रेसर गनमधून सुटलेला एक मोठा लोखंडी खिळा अत्यंत वेगाने येऊन थेट त्यांच्या छातीत शिरला. खिळा लागताच सुनील वेदनेने विव्हळत दुकानातच कोसळले. दुकानातील इतर कर्मचाऱ्यांनी व लोकांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु दुर्दैवाने रात्री १२ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा:Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!

CCTV फुटेजमुळे घटनेला वेगळे वळण; हत्येचा संशय!

या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका सीसीटीव्ही फुटेजने संपूर्ण प्रकरणाचे गूढ कमालीचे वाढवले आहे. या फुटेजमध्ये एक ग्राहक मद्याची बाटली खरेदी करण्यासाठी दुकानात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. मद्य खरेदी केल्यानंतर तो ग्राहक दुकानात ठेवलेली प्रेसर गन हातात घेतो आणि सुनील तायडे यांच्या छातीच्या दिशेने धरून काहीतरी संशयास्पद हालचाल करतो अन् तिथून निघून जातो. या क्लिपमुळे हा केवळ अपघात नसून हत्येचा मोठा कट असू शकतो, असा संशय नातेवाईकांनी व स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी सध्या अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस सीसीटीव्हीची सत्यता तपासून सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नाशिकच्या वाइन शॉपमध्ये मृत पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव काय आहे?

    Ans: मृत कर्मचाऱ्याचे नाव सुनील अनिल तायडे (वय ३९, रा. इन्कम टॅक्स कॉलनी, अंबड लिंकरोड, नाशिक) असे आहे.

  • Que: ही घटना नाशिकमध्ये कुठे आणि कशी घडली?

    Ans: सिडकोतील स्टेट बँक चौक परिसरातील 'लिकर कट्टा' वाइन शॉपमध्ये प्रेसर गनचा लोखंडी खिळा छातीत शिरल्याने ही घटना घडली.

  • Que: या घटनेला अपघाताऐवजी घातपाताचे वळण का मिळाले आहे?

    Ans: सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका ग्राहकाने प्रेसर गन हातात घेऊन सुनील तायडे यांच्या छातीकडे धरून संशयास्पद कृती केल्याचे दिसल्याने हत्येचा संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Nashik cidco wine shop pressure gun nail death sunil tayade cctv mystery sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Nashik Crime
  • Wine Shop

संबंधित बातम्या

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ
1

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!
2

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!

Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!
3

Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!

Jalgaon Crime News: रागाच्या भरात बायकोने लगावली कानशिलात, पतीने राग मनात ठेवून घेतला भयानक बदला…
4

Jalgaon Crime News: रागाच्या भरात बायकोने लगावली कानशिलात, पतीने राग मनात ठेवून घेतला भयानक बदला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.