
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा; उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार? वाचा एका क्लिकवर
Maharashtra Farmers: महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड करण्यासाठी महायुती सरकारने ५ हजार रुपयांची अग्रीम आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. आता या मदतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आतापर्यंत राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा झाले असून, पुढील दोन दिवसांत जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचेल, असे त्यांनी स्पष्ट केले.(Maharashtra Farmers)
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकरी मदतीचा आढावा दिला. ते म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अग्रीम रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. पुढील दोन दिवसांत जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. उर्वरित पाच टक्के शेतकऱ्यांच्या बाबतीत काही अडचणी असू शकतात. विशेषतः बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे काही लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास विलंब होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Financial Crisis: शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर
दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही या अग्रीम मदतीचा लाभ मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील २.७६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना सरकारमधील मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक असल्याची भूमिका सरकारने घेतली आहे. सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यावर आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही माहिती दिली. राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे भरल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या संवादात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मोर्चांबाबतही भाष्य केले. आमचे मोर्चे अराजकतेविरोधात आहेत, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर टीका केली. काँग्रेसचा ‘रेजीम चेंज’ करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असेही ते म्हणाले. दरम्यान, दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणारी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत महत्त्वाची ठरणार आहे. पुढील दोन दिवसांत ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांचे लक्ष आता त्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होण्याकडे लागले आहे.
Ans: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा म्हणून राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत दिली जात आहे.
Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे.
Ans: पुढील दोन दिवसांत जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. काही बँक खात्यांमधील तांत्रिक अडचणींमुळे विलंब होऊ शकतो.