Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Politics: पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; मध्यरात्री झळकले भुजबळ समर्थकांचे फलक, दुपारपर्यंत हटविण्याचे आदेश

Nashik Politics: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला तिढा अद्याप कायम असताना, शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा' अशी मुख्यमंत्र्यांना साद घालणारे फलक शहरभर लावले. मध्यरात्री लावलेल्या या फलकांनी राजकीय चर्चेला उधाण आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 11:28 AM
पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; मध्यरात्री झळकले भुजबळ समर्थकांचे फलक, दुपारपर्यंत हटविण्याचे आदेश (फोटो सौजन्य-ChatGPT)

पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; मध्यरात्री झळकले भुजबळ समर्थकांचे फलक, दुपारपर्यंत हटविण्याचे आदेश (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • ‘पालकमंत्री’ फलक बारा तासात काढले
  • राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
  • राज्यस्तरीय नेत्यांनीही घेतली वादात उडी
 

Nashik Politics News Marathi : गेल्या दोन वर्षापासून अडकलेला नाशिकचा (Nashik Politics) पालकमंत्रीपदाचा तिढा अजुनही सुटत नसतांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने सध्या गाजत असलेल्या शहरातील खड्यांच्या आड ‘भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा’ अशा आशयाचे मुख्यमंत्र्यांना आर्जव करणारे फलक शहरात लावल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. मध्यरात्री लावलेल्या या फलकांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतलेले असतांनाच मंत्री भुजबळ यांच्या आदेशान्वये दुपारी सदरचे फलक पुन्हा जमीनीवर आले आहेत.

दरम्यान, नाशिकचा पालकमंत्रीपदाचा वाद पुन्हा उफाळून आला असून, या पदावर महायुतीच्या तिन्हीही पक्षांनी दावा सांगितल्यामुळे पालकमंत्री अभावी जिल्ह्याचा कारभार हाकला जात आहे. तर नाशिकच्या या वादाचे थेट राज्यस्तरावर पडसाद उमटून खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी, ‘मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांच्या भावनेचा आदर करावा’ असे आवाहन केले तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘नाशिकचे खड्डे हे राज्य सरकारची सामुहिक जबाबदारी’ असे म्हणत मंत्री गिरीष महाजन यांची पाठराखण केली आहे.

भुजबळ – महाजनांमध्ये अबोला? गिरीश महाजनांबाबतच्या चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण, नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून मोठे विधान

सर्वसामान्य नाशिककरांच्या भावना…!

शहरात सर्वत्र पडलेले खड्डे व त्यातून पाच जणांचे बळी गेल्याने संपूर्ण शहरवासिय संतप्त झाले आहेत. या खड्ड्यांना नाशिक महापालिकाच जबाबदार असल्याची तीव्र प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती व कुंभमेळामंत्री गिरीष महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्त्यावर उतरून खड्यांकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली होती.

त्याला अनुषंगाने राष्ट्रवादीने शहरातील खड्यांच्या प्रश्नावर आंदोलनही सुरू केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने शहरभर फलक लावून नवीन वादाला तोड फोडले. ‘दत्तक नाशिकचे पालक, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्डुचापासून बाहेर काढा, सर्वसामान्य नाशिककरांच्या भावना’ असा मजकूर असलेले फलक लावल्याने सोमवारी सकाळी चर्चेचा विषय बनला. अनेकांनी या मागणीचे समर्थन केले असले तरी, त्यावरून राजकीय वाद सुरू होत असल्याचे पाहून मंत्री भुजबळ यांच्या सुचनेवरून दुपारी हे सर्व फलक हटविण्यात आले आहेत.

काय आहे राजकीय वाद?

गेल्या दोन वर्षांपासून महायुतीतील रस्सीखेचमुळे नाशिक व रायगड या दोन जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. भाजपाचे गिरीष महाजन यांना पालकमंत्री करा असा भाजपाचा आग्रह आहे तर शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यासाठी आग्रही आहे. अशातच महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीने ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे नाव लावून धरले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाल्याने पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले. त्या बदल्यात महाजन यांना कुंभमेळामंत्रीपद देवून नाशिकची जबाबदारी देण्यात आली. ध्वजारोहणाचा मानही त्यांनाच मिळतो. अशावेळी राष्ट्रवादीने पुन्हा भुजबळांसाठी सूर आळवल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

शहरातील प्रश्नावर राष्ट्रवादीने आंदोलन करून लक्ष वेधले आहे. अनेक संस्था, संघटनांनी भुजबळ यांना पालकमंत्री करावे अशी उघड मागणी जाहीरपणे केली आहे. जनभावनेचा भाग म्हणून फलक लावण्यात आले होते. त्यात राजकारण नव्हते. परंतु त्यातून राजकीय अर्थ काढला गेल्याने हे फलक काढण्यात आले,अशी प्रतिक्रिया युकों शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली.

Chhagan Bhujbal: ‘राजीनामा १५ दिवस आधी झाला असता तर…’, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य

Web Title: Nashik guardian minister row banners demanding chhagan bhujbal amid pothole crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Maharashtra Politics
  • Nashik

संबंधित बातम्या

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
1

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
2

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
3

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.