Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : हजारो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ, जिल्ह्यातील वसतिगृह आश्रमशाळांना भासतेय व्यावसायिक सिलिंडरची भ्रांत

व्यावसायिक सिलींडर मिळेनासे झाल्याच्या वृत्तानंतर तात्काळ या संस्थांनी आपली मागणी प्रशासनाकडे नोंदविली असली तरी, अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने विद्यार्थ्यांची उपासमार टाळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 15, 2026 | 06:22 PM
(फोटो सौजन्य-AI)

(फोटो सौजन्य-AI)

Follow Us
Follow Us:
  • हजारो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ
  • वसतिगृह आश्रमशाळांना व्यावसायिक सिलिंडरची भ्रांत
  • जिल्हा पुरवठा विभागाकडे २७९ सिलिंडरची मागणी
Nashik News : व्यावसायिक गॅस सिलींडरची बुकींग बंद केल्यामुळे बाहेरून शहरात शिक्षणासाठी आलेले व वसतीगृहाच्या आश्रयास असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न शैक्षणिक संस्थांपुढे आ वासून उभा ठाकला आहे. व्यावसायिक सिलींडर मिळेनासे झाल्याच्या वृत्तानंतर तात्काळ या संस्थांनी आपली मागणी प्रशासनाकडे नोंदविली असली तरी, अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने विद्यार्थ्यांची उपासमार टाळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या शैक्षणिक संस्थांना फटका

शासकीय आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहे असून खासगी शैक्षणिक संस्था असलेली मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था, आदिवासी सेवा समिती, ब्रह्मा व्हॅली, संदीप फाऊंडेशन, सपकाळ नॉलेज हब, भुजबळ नॉलेज सिटी अशा एक डझनाहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये दाखल होणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या सोयीसह वसतीगृह सध्या कार्यरत आहेत.

शासकीय संस्थांनाही झळ

आश्रमशाळा व जिल्हा परिषदेच्या शाळातील मध्यान्ह भोजन आणि पोषण आहार योजनेला बसली आहे. राज्यभरातून शिक्षण घेण्यासाठी आलेले हजारो विद्यार्थी या वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये आणि आश्रमशाळांमध्ये राहत आहे. या वसतिगृहांना वेळेवर सिलिंडर उपलब्ध झाले नाही, तर हजारो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे, जिल्हा परिषदेने तातडीने जिल्हा पुरवठा विभागाकडे २७९ सिलिंडरची मागणी नोंदवली आहे.

समाजकल्याणचे पत्र

शहरामध्ये समाजकल्याण विभागाचे दोन वसतिगृह आहे. यामध्ये आडगावमधील वसतिगृहामध्ये ९५० तर नासर्डी पुलाजवळील वसतिगृहात ४५० असे एकूण एक हजार ४०० विद्यार्थी आहेत.
या वसतिगृहाचे पालकत्व राज्य शासनाकडे असल्याने वसतिगृहांना सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, असे पत्र समाजकल्याण विभागाने पुरवठा विभागाला दिल्याचे सांगत शिल्लक गैस साठ्यावर अधिक बोलणे टाळले. त्यामुळे समाजकल्याणच्या वसतिगृहामध्ये काहींच आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय आदिवासी विकास विभागाने देखील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सिलिंडरचा पुरवठा सुरु राहण्यासाठी पुरवठा विभागाला पत्र दिले आहे.

नॉलेज सिटीत आठ, ब्रह्मा व्हॅलीत दोन हजार विद्यार्थी

भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतीगृहात सुमारे आठ हजार विद्यार्थी आहेत. संस्थेने वसतीगृहाच्या किचनचा ठेका खासगी व्यक्तीला दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुर्त अडचण नसली तरी, व्यावसायिक सिलीडर मिळत नसल्याने जेवणाच्या काही पदार्थामध्ये बदल करण्यात आला आहे. ठेकेदाराची सिलींडरसाठी कसरत सुरू आहे. ब्रह्मा व्हॅलीत दोन हजार विद्यार्थी आहेत. त्यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. आदिवासी विकास विभागाला संस्थेने पत्र देण्याची तयारी चालविली आहे. मराठा संस्थेच्या एका वसतीगृहात आठशे विद्यार्थी आहेत. सिलींडर नसल्यामुळे संस्थेने चूलीचा पर्याय निवडला आहे.

Web Title: Nashik news hostel ashram school students facing starvation due to commercial gas cylinder shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • lpg cylinder
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?
1

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
2

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
3

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
4

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.