Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: सुटे तेल विक्री बंदीमुळे व्यापारी अडचणीत; महिन्यातून दोनदा नमुने घ्या, पण बंदी उठवा

Nashik News: सुटे खाद्यतेल विक्रीवरील बंदीमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, महिन्यातून दोनदा नमुने घेऊन तपासणी करावी आणि भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करावी....

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 26, 2026 | 06:12 PM
nashik news loose-edible-oil-sale-ban-traders-demand-lifting-ban-sampling-twice-a-month

nashik news loose-edible-oil-sale-ban-traders-demand-lifting-ban-sampling-twice-a-month

Follow Us
Follow Us:
  • ‘गोरगरिबांची हेळसांड थांबवा’
  • सुटे खाद्यतेल विक्रीवरील बंदी मागे घेण्याची व्यापाऱ्यांची मागणी
  • सुटे तेल विक्रीचा तिढा; नियमित तपासणी करा
Nashik News Marathi: अन्न व औषध प्रशासनाने महिन्यातून दोन वेळा तेलाचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी आणि त्यात कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी. त्याला आमचा कुठलाही विरोध नाही मात्र, सरसकट सुटे तेल विक्रीवर निर्बंध लादणे पूर्णपणे अन्यायकारक आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया खाद्य तेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पटेल यांनी व्यक्त केली आहे.

पूर्वी शेंगदाणा तेल आणि इतर तेलांच्या (उदा. पाम तेल, सोयाबीन तेल) दरात मोठी तफावत असायची, ज्यामुळे भेसळीची शक्यता जास्त असायची. मात्र, सध्या परिस्थिती बदलली असून शेंगदाणा तेल व इतर तेलांच्या किमतीत फारसा फरक उरलेला नाही. त्यामुळे व्यापारी भेसळ करत नाहीत. तरीही कुणी दोषी आढळल्यास त्याला नक्कीच शिक्षा व्हावी, हीच व्यापाऱ्यांची भूमिका आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!

व्यापाऱ्यांना भुर्दंड; गोरगरिबांना उपाशी राहायचे का?

दरम्यान, शासनाने हा निर्णय घेताना गोरगरिबांचा आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा अजिबात विचार कैला गेलेला नाही. दररोज ४०० रुपये कमावणाऱ्या मजुराने २०० रुपयांची १ किलो तेलाची पिशवी खरेदी केली, तर उरलेल्या पैशात भाजी, मीठ, मिरची, डाळ आणि तांदूळ कसे खरेदी करायचे? मग

…तर नियमानुसार कठोर कारवाई करा

शासनाच्या आकडेवारीनुसार वर्षभरात १.२४७ तेलाचे नमुने घेण्यात आले. त्यातील १३ नमुने दोषी आढळले. हे नमुने किरकोळ विक्रेत्यांचे आहेत की कुणाचे? हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करून तिथे भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नक्कीच कारवाई करावी: परंतु संपूर्ण बंदीचा हा निर्णय प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. या निर्णयामुळे दुकानांवर किरकोळ विक्रेते आणि ग्राहक यांच्यात दररोज तीव्र वाद निर्माण होत आहेत.

अशा गोरगरिबांनी जगायचे कसे, असा अत्यंत संवेदनशील सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. राज्यात सुट्या तेलावर अचानक बंदी आणल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बहुतांश व्यापारी हे गुजरातहून खाद्य तेलाचे टैंकर मागवत असतात, ज्या दिवशी हा निर्णय जाहीर झाला त्या दिवशी गुजरातहून निघालेले ८ ते १० तेलाचे टैंकर परत पाठवावे लागले. परिणामी, व्यावसायिकांना एका गाडीमागे जवळपास १ लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने या सरसकट बंदीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी व्यापाऱ्याऱ्यांकडून केली जात आहे.

दोषी आढळला तर कठोर कारवाई करा

अधिकाऱ्यांनी महिन्यातून दोन वेळा तेलाचे नमुने घ्यावेत. त्यात कुणी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करावी. मात्र काही विक्रेत्यांमुळे इतर हजारो विक्रेते आणि लाखो गोरगरीबांना त्रास होईल, असा निर्णय घेऊ नये.- प्रकाश पटेल, अध्यक्ष, खाद्य तेल विक्रेता असोसिएशन

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण

Web Title: Nashik news loose edible oil sale ban traders demand lifting ban sampling twice a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • FDA
  • Nashik

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई
1

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई

धक्कादायक! भाताच्या भांड्यात उंदीर? ‘तबेला चाय’, ‘झमझम बिर्याणी’शी संबंधित असल्याचा दावा; नालासोपाऱ्यातील Video Viral
2

धक्कादायक! भाताच्या भांड्यात उंदीर? ‘तबेला चाय’, ‘झमझम बिर्याणी’शी संबंधित असल्याचा दावा; नालासोपाऱ्यातील Video Viral

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
3

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?
4

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.