नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी सुरू असलेल्या गौण खनिज वाहतुकीचा फटका नाशिककरांना बसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ओव्हरलोड वाहनांमधून माती-मुरूम रस्त्यावर सांडत असल्याने रस्त्यावर गाळाचा थर तयार होतो. पावसात हा गाळ निसरडा होत असल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे.
नाशिक शहरासह मुंबई-आग्रा महामार्गावर अशा अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे माती-मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री झाकणे, ओव्हरलोड वाहतूक रोखणे आणि रस्त्यावर सांडलेली माती तातडीने साफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.