Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : नाशिकमधील बंद मनपा शाळा पुन्हा सुरू होणार; दादा भुसे यांचे अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश

Nashik News : नाशिक महानगरपालिका हद्दीतील बंद शाळा आवश्यक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसह पुन्हा सुरू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. पंचवटी, सिडको आणि जेलरोड येथील मनपा शाळांची पाहणी करत त्यांनी सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण निर्माण करण्याच्या सूचना दिल्या.

  • By विवेक
Updated On: Oct 05, 2026 | 10:05 PM
dada bhuse at zp school

dada bhuse at zp school

Follow Us
Follow Us:
  • नाशिकमधील बंद मनपा शाळांची सद्यस्थिती तपासून वर्गीकरण करण्याचे निर्देश.
  • दुरुस्ती, स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना.
  • मनपा शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे आदेश.
 

Nashik News : नाशिक महानगरपालिका हद्दीतील बंद असलेल्या शाळांचे आवश्यक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसह पुनरुज्जीवन करून त्या पुन्हा सुरू कराव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मनपा शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी प्रभावी नियोजन आणि ठोस कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असंही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केलं.

दादा भुसे यांनी शाळांची केली पाहणी

मंत्री दादा भुसे यांनी नाशिक शहरातील पंचवटी येथील मनपा प्राथमिक शाळा क्रमांक 30, सिडको येथील मनपा माध्यमिक शाळा आणि जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक 56 यांची पाहणी केली.

Satara News:  :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

यावेळी त्यांनी शाळांमधील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, वर्गखोल्या, इमारतींची सद्यस्थिती, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतला.

यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, अजय बोरस्ते, प्रविण तिदमे यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बंद शाळांचे वर्गीकरण करून दुरुस्तीची कामे करा

महानगरपालिका हद्दीतील सध्या बंद असलेल्या सर्व शाळांची सद्यस्थिती तपासून त्यांचं योग्य पद्धतीने वर्गीकरण करावं, अशा सूचना भुसे यांनी दिल्या.

ज्या शाळांच्या इमारती किंवा परिसरात दुरुस्तीची आवश्यकता आहे, तिथली कामं प्राधान्याने आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांसाठीच्या इतर सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासही सांगण्यात आलं.

विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी ठोस कृती आराखडा

मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळण्यासोबतच शाळांच्या इमारती आणि परिसर आकर्षक असणंही गरजेचं असल्याचं मंत्री भुसे यांनी सांगितलं.

शाळांमध्ये सकारात्मक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाल्यास पालकांचा मनपा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होण्यास मदत होईल. त्यामुळे केवळ बंद शाळा पुन्हा सुरू न करता विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रलंबित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना

शाळांच्या पाहणीदरम्यान उपलब्ध शैक्षणिक साधने, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा आणि आवश्यक सुधारणांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

ज्या ठिकाणी आवश्यक कामं प्रलंबित आहेत, ती कामं कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Web Title: Nashik news municipal corporation closed schools reopen dada bhuse instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 10:05 PM

Topics:  

  • dada bhuse
  • maharashtra government school
  • Nashik News

संबंधित बातम्या

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार
1

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
2

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

Mumbai News: तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था बळकटीकरणावर गोलमेज! विद्यार्थ्यांचे आरोग्य नियोजनाचा भाग बनणे आवश्यक
3

Mumbai News: तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था बळकटीकरणावर गोलमेज! विद्यार्थ्यांचे आरोग्य नियोजनाचा भाग बनणे आवश्यक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.