फोटो सौजन्य सोशल मीडिया
त्यामुळे दुष्काळाने आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता पशुपालनाचा खर्च भागविण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना तातडीने दिलासा देण्यासाठी दूध खरेदी दरात वाढ करावी आणि दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या सवलती प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)ने केली आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकरी पशुपालनाकडे उत्पन्नाचा आधार म्हणून पाहत आहेत. मात्र जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध नसणे, पशुखाद्याच्या वाढत्या किमती आणि औषधोपचाराचा खर्च यामुळे दुग्ध व्यवसायाचे गणितही बिघडले आहे. त्यामुळे शेतीला आधार देणारा हा जोडधंदाच आता शेतकऱ्यांसाठी आर्थिक ओझे ठरत असल्याचे चित्र आहे.
Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर
पशुखाद्याच्या वाढत्या किमती, चाऱ्याची कमतरता, औषधोपचार आणि मजुरीमुळे एका लिटर दूध उत्पादनामागील खर्च वाढत आहे. मात्र त्याच्या तुलनेत दूध खरेदी दर पुरेसा नसल्याने दूध उत्पादकांच्या हातात प्रत्यक्षात किती उत्पन्न उरते, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या खरेदी दरात तातडीने वाढ करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सवलती आणि मदत केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणे आवश्यक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
चारा, पाणी, आर्थिक मदत आणि अन्य दुष्काळी सवलती पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दुष्काळाची तीव्रता वाढण्यापूर्वी प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास शेतीसोबत पशुपालनावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.






