Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Potholes: खड्डे की मृत्यूचा सापळा? खड्ड्याने घेतला उद्योजकाचा बळी; नाशिकमध्ये अपघातानंतर ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप

Nashik Potholes News: नाशिकच्या चांदवड-मनमाड मार्गावर रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला. कार नाल्यात कोसळल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2026 | 03:32 PM
खड्डे की मृत्यूचा सापळा? खड्ड्याने घेतला उद्योजकाचा बळी; नाशिकमध्ये अपघातानंतर ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप

खड्डे की मृत्यूचा सापळा? खड्ड्याने घेतला उद्योजकाचा बळी; नाशिकमध्ये अपघातानंतर ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप

Follow Us
Follow Us:
  • खड्डे की मृत्यूचा सापळा?
  • खड्ड्याने घेतला उद्योजकाचा बळी
  • नाशिकमध्ये अपघातानंतर ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप
Nashik Potholes News Marathi: नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता केवळ वाहतुकीची अडचण राहिले नसून, नागरिकांच्या जीवावर बेतणारा गंभीर प्रश्न बनले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरात खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आतापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका होत आहे. एकंदरीत काय तर खड्डे की मृत्यूचा सापळा आहे, असा प्रश्न उपस्थित आहे.

उद्योजक निलेश कोतकर यांचा दुर्दैवी मृत्यू

२८ जुलै रोजी अंबड एमआयडीसी परिसरातील एक्सलो पॉइंटजवळ झालेल्या अपघातात उद्योजक निलेश कोतकर यांचा मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला आणि ते खाली पडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. निलेश कोतकर यांच्या पश्चात पत्नी, अवघी तीन वर्षांची मुलगी, आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Nashik News: ‘रस्ते की खड्डे?’ सिंहस्थाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी; नागरिकांचा प्रशासनावर संताप

पत्नीचा आक्रोश, आईने सरकारला धरले जबाबदार

पतीच्या मृत्यूनंतर निलेश कोतकर यांच्या पत्नीने व्यक्त केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. “आता माझी तीन वर्षांची मुलगी कुणाला बाबा म्हणणार?” असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला. तर निलेश यांच्या आईने या मृत्यूसाठी सरकार आणि प्रशासनालाच थेट जबाबदार धरले आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी नागरिकांचा जीव वाचवणे हे प्रशासनाचे पहिले कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

खड्ड्यांवरून ठाकरे-शिंदे गट आमनेसामने

या दुर्घटनेनंतर नाशिकमधील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, ठाकरे गट आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक होत महापौरांच्या दालनात धडकले असून, महापौर येईपर्यंत दालन सोडणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे, मृत निलेश कोतकर यांच्या नातेवाईकांनी शहर अभियंत्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असताना महापौर हिमगौरी आडके या शहरातील विविध भागांची पाहणी करत असल्याची माहिती समोर आली. महापौर आणि आयुक्त बराच वेळ दालनात नसल्याने ठाकरे गटाने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

आतापर्यंत चार बळी

नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

२४ मार्च – प्रभाकर निकम

६ जून – प्रवीण गायकवाड

२५ जुलै – दीपाली बेळे

२८ जुलै – उद्योजक निलेश कोतकर

या सलग घटनांमुळे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्रशासनावर वाढता दबाव

रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या ठिकाणांची दुरुस्ती करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून होत आहे. निलेश कोतकर यांच्या मृत्यूनंतर नाशिकमधील रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, प्रशासन आता कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nashik Crime: 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…

Web Title: Nashik potholes kill 4 thackeray group aggressive nilesh kotkar death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Accident
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
4

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.